Silver prices witness sharp surge in Delhi bullion market, with gold also showing upward movement. saam tv
बिझनेस

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

Gold-Silver Price: दिल्लीच्या बाजारात चांदीच्या दरात प्रति किलो ₹३,५०० ची लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी आनंदाची लहर आहे.

Bharat Jadhav

  • चांदीच्या दरात ₹३,५०० प्रति किलोची मोठी वाढ

  • चांदीचा दर २.५ लाखांच्या पुढे

  • सोन्याच्या दरातही वाढ, पण तुलनेने कमी

देशाची राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात सर्वात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर २.५० लाख रुपयांच्या वर गेले आहेत. सोनेही महाग झाले आहेत, पण दरात हवी तशी वाढ झालेली नाही. मात्र किंमत १.५६ लाख रुपयांपर्यंत आलेत. तज्ज्ञांच्या मते, चलन बाजारात कोणतीही लक्षणीय हालचाल झालेली नाहीये. सराफा बाजारातील ही चढउतार अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेबद्दल चर्चेमुळे झाली आहे.

सोने आणि चांदीच्या दरात वाढ

सोन्याचे व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या नवीन खरेदीमुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीत चांदीचा भाव ३,५०० रुपयांनी वाढलेत यामुळे चांदी २.५० लाख रुपये प्रति किलो झाली आहे. तर सोन्याचा भावही किंचित वाढलाय यानुसार सोन्याचे दर १.५६ लाख रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. मागील सत्रात सोन्याचा भाव प्रति किलोग्राम २४७,००० वर बंद झाला होता. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव (सर्व करांसहित) प्रति १० ग्रॅम ₹२०० ने वाढून १५६,१०० रुपये इतका झाला आहे.

गुंतवणूकदार सतर्क

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक, सौमिल गांधी म्हणाले की, संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजारात हालचाल सुरू आहेत. सोमवारी सोन्याचा व्यवहार स्थिर राहिला आणि तो मागील सत्राच्या मर्यादेतच होता. अमेरिका-इराण संबंधांमधील तणावामुळे सराफा बाजार साधारण होता. दोन्ही देशातील राजनैतिक प्रयत्नांमधील मर्यादित प्रगती आणि नवीन वाटाघाटींसाठी कोणतीही स्पष्ट कालमर्यादा नसल्यामुळे कमोडिटीज आणि वित्तीय बाजारांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे.

परदेशी बाजारांमधील परिस्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये स्पॉट सोने आणि चांदीचे दर अनुक्रमे ४,७०४ डॉलर आणि ७५.६० डॉलर प्रति औंस या दराने किंचित घसरणीसह व्यवहार करत होते. मिराई असेट शेअरखानचे कमोडिटीज प्रमुख प्रवीण सिंग यांनी सांगितले की, अमेरिका-इराण चर्चा थांबल्याने स्पॉट सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आणि महागाईबद्दलची चिंता वाढली. मात्र नंतर धातूच्या किमती सावरल्या. प्रति औंस ४,७१० अमेरिकी डॉलरवर स्थिर होत्या, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT