Gig Workers Pension Update saam tv
बिझनेस

डिलिव्हरी बॉईज अन् कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शनचा नवा मार्ग मोकळा, जाणून घ्या सविस्तर

Gig Workers Pension Update: डिलिव्हरी बॉईज, कॅब चालक आणि गिग वर्कर्ससाठी NPS पेन्शन खातं उघडण्याची नवी प्रोसेस सुरू झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

डिलिव्हरी बॉईज, कॅब चालक आणि इतर गिग वर्कर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या कामगारांना भविष्यात निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा, यासाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत खातं उघडण्याचा नवा मार्ग तयार केला जात आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ई श्रम डेटाबेसशी जोडणी करून पात्र गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी एनपीएस खातं उघडण्याच्या प्रोसेसवर काम करत आहे.

ई-श्रम डेटाबेसच्या मदतीने उघडणार खाते

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, PFRDA चे अक्ष्यस एस. रमन यांनी सांगितलं की, सरकारच्या सामाजिक सुरक्षा संहितेअंतर्गत गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ देण्याची तरतूद आहे. यासाठी ई-श्रम मॉडेलचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ई-श्रम डेटाबेसशी समन्वय साधल्यानंतर कामगारांची संमती घेऊन त्यांची एनपीएस खाती उघडण्याची योजना आहे.

NPS Tatkal मुळे प्रक्रिया होणार सोपी

नवीन खाती उघडण्यासाठी नुक्त्याच सुरू करण्यात आलेल्या NPS Tatkal सुविधेचा वापर केला जाणार आहे. या सुविधेमुळे डिजिटल पद्धतीने लगेच खातं उघडता येते. यूपीआयशी जोडलेल्या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करता येणार असून, कागदपत्रांची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे.

फक्त ९९ रुपयांपासून बचत करण्याची संधी

ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू केलेल्या ई-श्रमिक मॉडेलनुसार, कामगार आणि त्यांच्याशी संबंधित एग्रीगेटर्सना सोप्या पद्धतीने पेन्शन खात्यात योगदान देता येतं. हे योगदान ९९ रुपयांपासून सुरू करता येऊ शकतं. दर महिन्याला ठरावीक रक्कम भरण्याचं बंधन नसल्यामुळे अनियमित उत्पन्न असलेल्या कामगारांना बचत करणं सोपं होऊ शकतं. या खात्यात कायमस्वरूपी निवृत्ती खातं क्रमांक (PRAN) जोडला जाणार आहे. त्यामुळे नोकरी किंवा कामाचे प्लॅटफॉर्म बदलले तरी खात्याशी संबंधित बचत कायम ठेवता येईल.

गुंतवणुकीसाठी NPS Sanchay पर्याय

सुरुवातीला या खात्यांमध्ये NPS Sanchay अंतर्गत ठरावीक, तुलनेने सावध ते मध्यम जोखमीची गुंतवणूक पद्धत लागू असेल. पुढे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार गुंतवणुकीचे ऑप्शन बदलण्याची संधी मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Public Washroom Safety : महिलांनो सावधान! पब्लिक वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? आत शिरताच 'या' ५ जागा तपासा

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुरतच्या दिशेने रवाना

Accident News : देवदर्शनाला गेलेल्या मित्रांचा तो दिवस अखेरचा ठरला! भरधाव ट्रकच्या धडकेत ४ तरुणांचा मृत्यू; चार जखमी

Foods Storage Tips In Fridge: फ्रिजमध्ये 7 पदार्थ चुकूनही ठेवू नका : आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; सुरत एक्सप्रेसमधून २ आरोपींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT