Sakshi Sunil Jadhav
बऱ्याचदा अडगळीच्या खोलीत किंवा अंगणात साप दिसतात. अशा वेळेस घाबरून न जाता तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
काहींना नाग आणि नागीण ओळखता येत नाही. तर सापाची लांबी, जाडी किंवा रंग पाहून तो नर आहे की मादी, हे तुम्ही सहज ओळखू शकता.
हा समज चुकीचा आहे. सापाची शरीरयष्टी त्याची प्रजाती, वय आणि इतर जैविक घटकांनुसार बदलते.
सापापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांना त्या ठिकाणापासून दूर न्या.
काठीने मारणे, पकडणे किंवा हुसकावून लावणे टाळा. अशा कृतींमुळे साप चावण्याचा धोका वाढतो.
घराभोवतीचे उंच गवत, झुडपे, कचरा आणि भंगार नियमितपणे हटवा, जेणेकरून सापांना लपण्यासाठी जागा कमी मिळेल.
भिंतींमधील फटी, दरवाजांखालील मोकळ्या जागा आणि पाईपच्या आसपासची छिद्रे योग्य पद्धतीने बंद करा.
लेमनग्रास किंवा स्नेक प्लांट लावल्याने साप हमखास दूर राहतात, याला पुरेसा वैज्ञानिक पुरावा नाही.
सापापासून सुरक्षित अंतर राखा आणि त्याला हाताळण्याऐवजी प्रशिक्षित तज्ज्ञांची मदत घ्या.