Gautam Adani Stocks Up By 15 to 16 Percent  Saam TV
बिझनेस

Gautam Adani Stocks: गौतम अदानींना दिलासा मिळताच शेअर बाजारात उसळी; गुंतवणुकदारांना फायदाच फायदा!

Gautam Adani News: गौतम अदानींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळताच शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे.

Satish Daud

Gautam Adani Stocks

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात एसआयटी तपासाची गरज नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्याचबरोबर सेबी चौकशी नियमांनुसार असून आंतरराष्ट्रीय अहवालाच्या चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. जाणून-बुजून नियमांचे उल्लंघन झालं असेल तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी असे मत कोर्टाने व्यक्त केलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, गौतम अदानींना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) दिलासा मिळताच शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. अदानी समूहातील सर्व १० सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तर अदानी टोटल गॅस १० टक्क्यांनी आणि एनडीटीव्ही शेअर्स ८ टक्क्यांनी वधारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पॉवर या कंपन्यांचे समभाग ६ ते ७ टक्क्यांनी वधारले आहेत. त्याचप्रमाणे अदानी पोर्ट्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे.

अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक स्फोटक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये अदानी समूहावर शेअरच्या किमतीत छेडछाड करण्यासह अनेक आरोप करण्यात आले होते. (Latest Marathi News)

यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकार अदानी समूहाला वाचवत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. यामुळे अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले होते. दुसरीकडे अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले होते.

कंपनीचे मार्केट कॅप झपाट्याने खाल्याने अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. त्यांचे बाजारातील भांडवल तब्बल १५० अब्ज डॉलरने घसरले होते. त्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले होते. कोर्टाने तपासासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT