Flipkart Sale Google
बिझनेस

Flipkart Sale : 50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला मोटोरोला फोनवर मोठी सूट; Vivo फोनही झाला स्वस्त, जाणून घ्या ऑफर

Bharat Jadhav

Flipkart Sale Big Discount On Motorola :

जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. फ्लिपकार्टच्या फ्रीडम डील्समध्ये तुम्ही महागडे मोबाईल स्वस्त किंमतीत विकत घेऊ शकतात. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Vivo T2 Pro 5G आणि Motorola Edge 40 NEo वर ऑफर आहे.(Latest News)

या सेलमध्ये तुम्ही हे फोन मोठ्या बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या दोन्ही कंपनीच्या मोबाईलचे फीचर्स चांगले असून ते तुम्हाला आवडतील. सध्या चालू असलेल्या सेलमध्ये बंपर एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. 8 जीबी रॅम सह या फोन्समध्ये तुम्हाला मजबूत कॅमेरा सेटअप देखील मिळेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोटोरोला एज 40 नियो

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी 10% कमी करू शकता. कंपनी या फोनवर 22 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. तर काही निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सवलतीचा लाभदेखील तुम्ही घेऊ शकतात.

तुम्ही जर एक्सचेंज करत असला तर एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, मोबाईलवर मिळणारी सूट ही तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. मोटोरोला एज ४० डायमेंशन 7030 प्रोसेसर सह येतो. त्याचा फुल एचडी+ डिस्प्ले 6.55 इंची आहे आणि तो 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीआवड ठेवणाऱ्या लोकांना लक्षात ठेवत कंपनीने या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलाय.

विवो T2 प्रो 5G

सेलमध्ये विवोचा फोनदेखील स्वस्त किंमतीत मिळत आहे. Vivo चा वीवो T2 प्रो 5G फोन 23,999 रुपयांमध्ये तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही जर बँक य ऑफरमध्ये हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अजून 2000 रुपायांची सूट मिळेल. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरले तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. तुम्ही जुना फोन घेऊन नवा फोन एक्सचेंजमध्ये घेत असाल तर यात तुम्हाला 17,950 रुपयांचा फायदा होऊ शकतो.

Vivo च्या फोनला MediaTek Dimension 7200 प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनला 6.78 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. तर 64 मेगापिक्सलचा रियर आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. फोनची बॅटरी 4600mAh असून ती 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT