Banking Employees  Saam tv
बिझनेस

Five Day Working: खुशखबर; 'या' क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'फाइव्ह डे' वर्किंग, अन् पगार...

Banking Employees : निवडणुकीपूर्वीच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांची लॉटरी लागलीय. लवकरच या बँकांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी फक्त ५ वर्किंग डे असणार आहेत. तर पगारातही वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

Five Day Working For Banking Employees:

सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांच्या पगारात घसघसीत वाढ होणार आहे. त्यांच्या पगारात दरवर्षी १७ टक्क्यांनी वाढ होणार आहे. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांचा पगार वाढणार आहे. देशातील कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांसाठीही 'आठवड्यातील ५ कामकाजाचे दिवस असणार आहेत' या कायद्याला केंद्राकडून मंजुरी मिळू शकते.(Latest News)

या निर्णयामुळे सरकारी बँकांमधील सुमारे ८ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त रजेचा लाभदेखील मिळणार आहे. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांचा पगार वाढणार असल्याने या कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये दर शनिवारी सुट्टी मंजूर करण्याचे मान्य केले आहे. सध्या देशात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बँकांमध्ये 5 वर्किंग डे कल्चर येणार आहे. मात्र, यामुळे बँकांमधील कामाचे तास वाढणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारने हे प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आणि नियम अधिसूचित केल्यानंतर घेतला जाईल.

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये दर शनिवारी सुट्टी मंजूर करण्याचे मान्य केले आहे. सध्या देशात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बँकांमध्ये फाइव्ह डे वर्किंग कल्चर येणार आहे. मात्र, यामुळे बँकांमधील कामाचे तास वाढणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजून बाकी आहे.

ज्यावेळी सरकारने हा प्रस्ताव स्वीकारेल आणि नियम अधिसूचित करेल त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. ८०८८ गुणांचा महागाई भत्ता (DA)आणि त्यावर अतिरिक्त भार टाकून कर्मचाऱ्यांच्या नवीन पगाराची गणना करण्यात आल्याची माहितीही बँक अधिकारी संघटनेने दिलीय. नवीन वेतन करारानुसार सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देता दरमहा एक दिवसाची 'आजारी रजा' घेण्याची मुभा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT