plastic ₹10 and ₹20 notes Fact Check Saam TV plastic notes Fact Check
बिझनेस

Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

plastic ₹10 and ₹20 notes Fact Check : आरबीआयने १० आणि २० रुपयांच्या २०० कोटी पॉलिमर (प्लॅस्टिक) नोटांच्या चाचणीला मंजुरी दिली आहे. मात्र, सध्याच्या कागदी नोटा बंद होणार नसून त्या प्लॅस्टिक नोटांसोबतच वैध राहतील.

Namdeo Kumbhar

RBI polymer note trial latest news : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशात 'पॉलिमर' म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटा आणण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली असून, सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या तब्बल २०० कोटी प्लॅस्टिक नोटांचे ट्रायल रन केले जाणार आहे. या निर्णयामुळे जुन्या कागदी नोटांचे काय होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पण घाबरण्याचे अजिबात कारण नाही; कागदी नोटा लगेचच रद्द किंवा बंद होणार नाहीत.

आरबीआयच्या स्पष्टीकरणानुसार, कागदी आणि प्लॅस्टिकच्या नोटा दोन्ही एकाच वेळी बाजारात व्यवहारासाठी वैध राहतील. प्लॅस्टिक नोटा अधिक टिकाऊ, फाटण्यापासून सुरक्षित आणि जास्त आयुष्य असलेल्या असल्याने त्या टप्प्याटप्प्याने बाजारात आणल्या जात आहेत. त्यामुळे जुन्या कागदी नोटांची वैधता कायम राहील आणि कोणत्याही नोटबंदीशिवाय हा बदल होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नेमका निर्णय काय आहे?

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला (RBI) २ अब्ज (२०० कोटी) पॉलिमर (प्लास्टिक) नोटा छापून त्यांची चाचणी (Field Trials) घेण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. लोकसभेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात १० रुपये आणि २० रुपयांच्या नोटा पॉलिमर स्वरूपात छापल्या जातील. यात १ अब्ज नोटा १० रुपयांच्या तर १ अब्ज नोटा २० रुपयांच्या असतील.

प्लास्टिक नोटा म्हणजे काय? कागदी नोटा बंद होणार का?

सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या नोटा या विशेष प्रकारच्या कागदापासून तयार केल्या जातात. पण पॉलिमर नोटा या कागदाऐवजी टिकाऊ प्लास्टिक फिल्मवर छापल्या जातात. सध्या ऑस्ट्रेलियासह जगभरात ६० देशांमध्ये कागदी नोटा चलनात आहेत.

प्लॅस्टिकच्या नोटा बाजारात आल्यानंतर जुन्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाजारात कागदी नोटा आणि प्लास्टिक नोटा या दोन्ही एकाच वेळी चलनात राहतील. त्यामुळे जुन्या कागदी नोटा अचानक बाद किंवा रद्द होणार नाहीत.

प्लास्टिक नोटा का आणल्या जात आहेत?

१० आणि २० रुपयांच्या नोटा, खूप वेगाने खराब होतात, फाटतात. पॉलिमर नोटा कागदी नोटांपेक्षा खूप जास्त काळ टिकतात. या नोटा प्लास्टिकच्या असल्याने त्यावर पाणी, तेल किंवा घामाचा परिणाम होत नाही. पॉलिमर नोटांवर अत्यंत अत्याधुनिक आणि गुंतागुंतीचे सिक्युरिटी फीचर्स (सुरक्षा वैशिष्ट्ये) असतात. त्यामुळे यांची हुबेहूब बनावट नोट बनवणे गुन्हेगारांसाठी अत्यंत कठीण असते. या नोटा जास्त काळ टिकत असल्याने रिझर्व्ह बँकेला वारंवार नवीन नोटा छापण्याचा मोठा खर्च करावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढलले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

महिलांसाठी खास छोट्या आणि मोठ्या वाट्यांचे मंगळसूत्र; लेटेस्ट ५ ट्रेंडी पॅटर्न

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

SCROLL FOR NEXT