Career After 10th Saam Tv
बिझनेस

Career After 10th: दहावीची परीक्षा तर झाली, आता पुढे काय? कोणता करिअर ऑप्शन निवडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Career Guidance After 10th: दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पुढे काय करायचा हा प्रश्न पडला असेल. कोणता करिअर आपल्यासाठी उत्तम असेल याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Siddhi Hande

दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता पुढे काय असा प्रश्न पडला आहे. त्यांना पुढे करिअरसाठी काय ऑप्शन निवडायचे, कोणत्या क्षेत्रात आपल्याला काम करायचंय त्यानुसार अभ्यासक्रम निवडायची संधी असते.

जर तुम्ही आता योग्य निर्णय घेतला तर भविष्यात कधीही कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. विद्यार्थ्यांना आधी स्वतः चे कलागणु, आवड आणि पुढे काय करायचंय हे ठरवता आलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात कोणत्या क्षेत्रात काम करायच आहे त्यानुसार तुम्हाला आता करिअर निवडावे लागणार आहे.

दहावीनंतर काय? (Career Options After 10th)

दहावीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. विद्यार्थ्यांच्या आईवडीलांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतात. तर दहावीनंतर तुम्हाला अनेक करिअरच्या संधी उपब्ध होतात.

विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा

तुम्हाला जर अकरावी आणि बारावी करायची असेल तर तुमच्याकडे या तीन विज्ञान, वाणिज्य आणि कला विषयांमधून करिअर करण्याची संधी आहे. यामध्ये तुम्हाला पुढे जर आयटी, विज्ञान विषयात करिअर करायचे असेल तर विज्ञान शाखेचा पर्याय निवडा.

जर तुम्हाला पुढे भविष्यात बँकेत किंवा फायनान्स क्षेत्रात का करायचे असेल तर तुम्ही कॉमर्सचा पर्याय निवडू शकतात. तसेच स्पर्धा परीक्षा द्यायचा विचार करत असाल तरीही हा ऑप्शन उत्तम आहे.

जर तुम्हाला कलाविश्वात काम करायचे असेल. तुम्हाला अॅक्टिंग, नृत्य किंवा संगीत या विषयाची आवड असेल तर तुम्ही कला या विषयाचा ऑप्शन निवडू शकताच. तसेच जर्नलिझम करायचा विचार करत असाल तर कला शाखेचा पर्याय निवडू शकतात.

इंजिनियरिंग डिप्लोमा

जर तुम्हाला भविष्यात इंजिनियर व्हायचे असेल तर तुम्ही डिप्लोमासाठी अॅडमिशन घेऊ शकतात. डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला इंजिनियरिंग डिग्री प्राप्त करणे सोपे जाणार आहे.

स्पर्धा परीक्षा

तुम्ही दहावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करु शकतात. रेल्वे तिकीट कलेक्टर, बँक इन्शुर्नस क्लर्क परीक्षा या परीक्षा देऊ शकतात. परंतु जर तुम्हाला बँकेची परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT