EV Charging meta ai
बिझनेस

EV Charging : इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग आता इमारतीतच; नव्या सोसायट्यांसाठी EV पॉईंट्स अनिवार्य होण्याची शक्यता

Electric Vehicles : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असताना नव्या इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग पॉईंट्स अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. जुन्या सोसायट्यांनाही चार्जिंग स्टेशनसाठी प्रोत्साहन आणि सवलत मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक डिजिटल उपकरणांसोबत इलेक्ट्रिक वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे चार्जिंगच्या सुविधा उपलब्ध असणंही गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर आता नव्या इमारचींमध्ये EV चार्जिंग पॉईंट्स देणं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे सोसायटीमध्येच इलेक्ट्रिक गाडी चार्ज करण्याची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दरम्यान महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV)वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

राज्याच्या EV धोरणाचा भाग म्हणून विद्यमान विकास नियंत्रण नियमांमध्ये (UDCPR) बदल करण्याची मागणी परिवहन विभागाने नगरविकास विभागाकडे केली आहे. त्यामध्ये नव्या इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट्स किंवा चार्जिंग केंद्रासाठी पुरेशी जागा आणि सुविधा उपलब्ध नसेल तर बांधकाम प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, असा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. या बदलांची अंमलबजावणी पुढच्या आर्थिक वर्षापासून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यमान सोसायट्यांनाही प्रोत्साहन

जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारी प्रोत्साहनांचा लाभ मिळू शकतो. ५० टक्के रहिवाशांनी चार्जिंग स्टेशनसाठी जागेची मागणी केल्याने सोसायटीने त्यासाठी जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. अशा सुविधांना वीज वितरण कंपन्यांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनांसोबत महानगरपालिका करांमध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी मोठा खर्च हा महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. १० चार्जिंग पॉईंट्सच्या केंद्रासाठी वितरण पॉईंट (DP) अपग्रेड करण्याचा खर्च ४० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या खर्चात सवलत देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT