EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO Update: EPFO चा मोठा निर्णय! या PF खातेधारकांना KYC अनिवार्य; अन्यथा अकाउंट होणार बंद

EPFO Update KYC Mandatory to PF Holders: ईपीएफओ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही ईपीएफओ खातेधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केले नाही तर त्यांचे अकाउंट बंद होईल.

Siddhi Hande

पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी

या खातेधारकांना केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास अकाउंट होणार बंद

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये कर्मचारी दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम जमा करतात. दरम्यान, ईपीएफओ अनेकदा पीएफसंदर्भातील नियमांमध्ये बदल करते. दरम्यान, पीएफ खात्यातील नियमांमधील बदल प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित असायला हवे. अन्यथा त्यांना आर्थिक फटका बसू शकतो.

देशातील लाखो पीएफधारकांचे अकाउंट बंद झाले आहे. त्यांचे पैसे वर्षानुवर्षे अकाउंटमध्ये तसेच आहेत. हे पैसे कोणाला काढता येणार नाहीये. यामुळेच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, यासाठी ईपीएफओ एक मिशन सुरु करणार आहे.

या पीएफ खातेधारकांना केवायसी अनिवार्य

सरकारच्या या नवीन मिशनअंतर्गत या अकाउंटधारकांना केवायसी व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे अकाउंट बंद आहेत त्यांच्यासाठी ही केवायसी प्रोसेस असणार आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जाईल. योग्य व्हेरिफिेशन केले जाऊन त्यानंतर त्यांना पैसे दिले जातील. जर केवायसी पूर्ण झाले नाही तर खाते कायमचे बंद होतील.

मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, भारत आणि युकेमध्ये झालेल्या करारानुसार आता इतर देशांमध्येही होणाऱ्या करारात सोशल सिक्युरिटी क्लॉज असणार आहे. भारतीय कर्मचारी जर परदेशात काम करुन पुन्हा भारतात ईला असेल तर त्याचे पीएफचे पैसे वाया जाणार नाही. ते भारतात येऊन पुन्हा हे पैसे मिळवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Cheela: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा रवा चीला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : लातूर मनपा निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik: एबी फॉर्मची पळवापळवी, नाशिकमध्ये भाजपात राडा, ३ आमदारांच्या गाडींचा जिल्हाध्यक्षांकडून पाठलाग; पाहा VIDEO

Eye Makeup Tips: डोळे मोठे दिसत नाहीत? या ४ सोप्या टिप्स करा फॉलो, बारिक डोळे दिसतील टपोरे अन् रेखीव

Pranjal Dahiya Video: 'काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची...'; कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्याला गायिकेने सुनावली खडे-बोल

SCROLL FOR NEXT