PF New Rules 2026 meta ai
बिझनेस

EPFO Update: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अडकलेला PF Transfer होणार झटपट; फक्त 5 मिनिटांचं काम

How to Update UAN Portal: १ ऑक्टोबर २०२६ पासून SMART-PDS मध्ये Silent Ration Card आणि Duplicate Beneficiary तपासणी होणार आहे. रेशन कार्डधारकांनी e-KYC पूर्ण करून आपली माहिती आणि पात्रता अपडेट ठेवावी.

Sakshi Sunil Jadhav

नोकरी बदलल्यानंतर जुना EPF बॅलन्स नवीन कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर करताना ‘Date of Exit’ म्हणजेच नोकरी सोडल्याची तारीख अचूक असणं अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा जुनी कंपनी EPFO पोर्टलवर ही तारीख अपडेट करत नाही. त्यामुळे पीएफ ट्रान्सफरची प्रोसेस रखडू शकते. मात्र, आता यासाठी जुन्या कंपनीच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज नाही. EPFO चे सदस्य स्वत: UAN पोर्टलवरून ‘Date of Exit’ऑनलाइन अपडेट करू शकतात.

यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. नोकरी सोडून किमान दोन महिने पूर्ण झालेले असावेत. तसेच तुम्ही टाकत असलेली तारीख ही जुन्या कंपनीने शेवटचा पीएफ योगदान जमा केलेल्या महिन्यातली असावी. तुमचा UAN अॅक्टिव्ह आणि आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. याशिवाय आधारशी जोडलेला मोबाइल नंबरही जवळ असावा, कारण OTP द्वारे पडताळणी केली जाते.

‘Date of Exit’ कशी अपडेट कराल?

सर्वात आधी EPFO Member Unified Portal वर UAN आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर Manage - Mark Exit हा ऑप्शन निवडा. संबंधित जुन्या कंपनीची Member ID निवडा. नोकरी सोडल्याची अचूक तारीख आणि योग्य कारण भरा. ही तारीख सॅलरी स्लिप किंवा रिलिव्हिंग लेटरशी जुळतेय का याची खात्री करा. त्यानंतर कन्सेंट बॉक्सवर क्लिक करून Get OTP हा ऑप्शन निवडा. आता आधारशी लिंक मोबाइलवर आलेला OTP टाकून प्रोसेस सबमिट करा. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर View - Service History मध्ये जाऊन Date of Exit अपडेट झाली आहे का, हे तपासा.

तारीख चुकीची असल्यास काय कराल?

कंपनीने आधीच चुकीची Date of Exit नोंदवली असेल, तर ती थेट ऑनलाइन बदलता येत नाही. अशावेळी संबंधित कागदपत्रांसह जुन्या कंपनीशी संपर्क करावा किंवा EPFiGMS च्या मदतीने तक्रार दाखल करा. तसेच UAN पासवर्ड, आधार किंवा बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT