खासगी कंपनीत नोकरी करून निवृत्त झालेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) किमान मासिक पेन्शन १००० रुपयांवरून थेट ३००० रुपये करण्याचा विचार करू शकते. त्यामुळे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तर यासंदर्भात १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीकडे लाखो पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक १९ नोव्हेंबर रोजी गुजरातमधल्या गिर या ठिकाणी होईल. या बैठकीत किमान पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या EPS अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना किमान १००० रुपये मासिक पेन्शन मिळते.
ही रक्कम वाढवून ३,००० रुपये करण्याची मागणी कामगार संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. पेन्शन वाढीचा निर्णय झाल्यावर लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो. पण अजून सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून आणि महागाई भत्त्यातून (DA) १२ टक्के योगदान पीएफ खात्यात जमा केले जातात. कंपनीकडूनही १२ टक्के योगदान दिलं जातं. यातले ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये, तर ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा होते.
EPS पेन्शनची गणना करण्यासाठी एक ठरावीक सूत्र वापरलं जातं.
मासिक पेन्शन = पेन्शनयोग्य सरासरी पगार × पेन्शनयोग्य सेवा ÷ ७०
यासाठी किमान १० वर्षांची पात्र सेवा आवश्यक असते. पेन्शनयोग्य पगाराची गणना शेवटच्या ६० महिन्यांच्या सरासरी पगारावर आधारित असते. त्यामुळे १९ नोव्हेंबरच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. किमान पेन्शन वाढवल्यावर रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.