PF withdrawal new rules AI
बिझनेस

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

EPFO 3.0 Withdrawal Rule Change: EPFO 3.0 मुळे PF काढण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. आता UPI आणि ATM द्वारे पैसे काढता येतील. ५ लाखांपर्यंत रक्कम जलद मिळणार असून नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

अनेकजण वर्षानुवर्षे काम करत असतात. त्यांच्या पगारातला काही टक्के भाग ते बचत करत असतात. याचा फायदा त्यांना भविष्यात होतो. यासाठी विशेष गुंतवणूक नाहीतर, तर PF खात्यात रक्कम ठेवली जाते. ही रक्कम तुम्ही गरजेच्या वेळी काढू शकता. पण EPFOच्या खातेधारकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल घडवून आणला आहे.

EPFO 3.0 या नवीन योजनेच्या मदतीने सर्व कर्मचाऱ्यांना PF काढणं सोपं होणार आहे. तसेच गेल्या ६० वर्षांपासून अनेकांना लांबच्या लांब रांगा लावून आठवडा किंवा महिनाभर वाट पाहून PF काढता यायचा. आता याची प्रोसेस खूप सोपी झाली आहे. तुम्हाला ATM किंवा UPIच्या मदतीने पीफचे पैसे काढता येणार आहेत.

कर्मचाऱ्यांना आता ७४ टक्के पर्यंतची रक्कम UPIच्या मदतीने विड्रॉल करता येईल. यासाठी तुम्ही डिजीटल पेमेंट्सचा सुद्धा वापर करु शकणार आहात. त्यामध्ये गुगल पे आणि फोनचा समावेश असेल. त्याचसोबत तुम्हाला EPFO वेगळं पीएफ एटीएम कार्डसुद्धा देऊ शकतं. पण यामधली अट म्हणजे तुम्ही यामध्ये पीफमधील ५० टक्केच काढू शकता.

मोठी बाब म्हणजे यामध्ये आधी १३ वेगवेगळ्या श्रेणी होत्या. त्यातील फक्त ३ श्रेणी असणार आहेत. तसेच यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय मिळणारी रक्कम ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये तुमच्या कंपनाची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. PFचे पैसे काढताना काही रक्कम राखीव ठेवावी लागते. तुमच्या खात्यात किमान २५ टक्के रक्कम शिल्लक राहणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT