EPFO  Saam Tv
बिझनेस

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

EPFO New Rule: ईपीएफओच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता तुम्ही १०० टक्के पीएफ काढू शकतात. यासाठीदेखील काही अटी आहेत. त्या अटींनुसार तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएफ काढण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. तुम्ही आता पीएफ १०० टक्के पीएफ काढू शकतात. दरम्यान, पीएफच्या नियमात बदल झाल्यानंतर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तुम्हाला किती पीएफ काढता येणार, किती कालावधीत पीएफ काढता येणार असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडले आहेत. आज आम्ही तुम्हाला पीएफबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

नोकरी गेल्यानंतर पूर्ण पीएफ काढू शकणार का?

ईपीएफओच्या म्हणण्यांनुसार, आता नोकरी गेल्यानंतर कर्मचारी ईपीएफमधील शिल्लक रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम लगेच काढू शकतात. यानंतर उर्वरित २५ टक्के रक्कम १ वर्षानंतर काढू शकतात.

नोकरी गेल्यानंतर किती दिवसांत पेन्शन काढू शकतात?

पेन्शन काढण्यासाठी काही नियम आहेत. जर तुम्ही ३६ महिने बेरोजगार असाल तर तुम्हाला पेन्शन काढता येते. याआधी ही मर्यादा दोन महिन्याची होती.

नोकरी गेल्यानंतर लगेच १०० टक्के रक्कम काढता येणार का?

जर एखाद्याने नोकरी गेल्यानंतर लगेचच १०० टक्के रक्कम काढली तर त्यांची सेवा खंडीत केली जाईल. पेन्शन मिळवण्यासाठी १० वर्षे काम करणे अनिवार्य आहे. सतत पीएफ काढल्यावर १० वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही. त्यामुळेच ७५ टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे. उर्वरित रक्कम १ वर्षानंतर दिली जाते.

ईपीएफ सेटलमेंटचा कालावधी

ईपीएफ सेटलमेंटसाठी आता १२ महिन्याचा कालावधी लागणार आहे. ईपीएफ काढण्यासाठीची मर्यादा ३६ महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ईपीएफओने माहिती दिली आहे.

ईपीएफओचा कोणता नियम बदलला आहे? (EPFO Rule Change)

ईपीएफ सदस्यांना पीएफ काढण्यासाठी काही अटी आहेत. एक म्हणजे जर सदस्य दोन महिन्यासाठी बेरोजगार असाल तर तुम्हाला पीएफचे पैसे काढता येतात. यातही ७५ टक्के रक्कम तात्काळ काढता येणार आहे आणि उर्वरित रक्कम ३६ महिन्यानंतर काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Rajasthan: बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

Sunidhi Chauhan: सुनिधी चौहान Live कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना अचानक रडू लागली, नेमकं काय घडलं?

Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तारीख ठरली, पण सातबारा कोरा कधी होणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT