EPFO New Rule Google
बिझनेस

EPFO New Rule: खुशखबर! आता कोणत्याही बँकेतून काढता येणार पेन्शनची रक्कम; EPFO चा नवीन नियम कधीपासून लागू होणार? सविस्तर वाचा...

EPFO New Rule : ईपीएफओधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे.

Siddhi Hande

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना EPS मधून पेन्शन काढणे अजूनच सोपे होणार आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. या पेन्शनसाठी आधी त्यांना त्यांच्या रजिस्टर बँकेच्या ब्रँचमध्ये जावे लागायचे. मात्र, आता कर्मचारी कोणत्याही बँकेच्या ब्रँचमधून पैसे काढू शकतात. त्यामुळे कर्मचारी कुठेही असेल तरीही त्याला पेन्शन काढता येणार आहे. केंद्र सरकारने या नवीन नियमाला मंजूरी दिली आहे.

ईपीएफओचा नवीन नियम

केंद्र सरकारला सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीमकडून ईपीएस १९९५ साठी प्रस्ताव मिळाला होता. या प्रस्तावानंतरच हा नवीन नियम लागू करायचा होता. आता हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. या नवीन नियमामुळे कर्मचारी कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढू शकतात. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फाया होणार आहे.

ईपीएओमधील ७८ लाख कर्मचाऱ्यांना या नियमाचा लाभ होणार आहे. आयटी आणि बँकिंग टेक्नोलॉजीचा वापर करुन पेन्शनधारकांना अधिक चांगला अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.

सध्या पेन्शनधारकांना त्यांच्याच बँकेच्या ब्रँचमधून पैसे काढता येत होते. त्यामुळे पेन्शन काढायची असल्यास त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागायचे. मात्र, आता ईपीएफओच्या नवीन नियमांमुळे पेन्श काढणे खूप सोपे होणार आहे.

CPPS हे सध्याच्या पेन्शन पॉलिसीमध्ये महत्त्वाचा बदल आहे. यामध्ये ईपीएफओ थेट वेगवेगळ्या ३-४ बँकांशी सांमजस्य करार करणार आहे. यामध्ये पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेत जाऊन व्हेरिफिकेशन करण्याची आवश्यकता पडणार आहे. पेन्शन जारी झाल्यानंतर लगेचच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT