EPFO ने सुमारे ८ कोटी सदस्यांसाठी नवीन PF नियम जाहीर केले आहेत.
PF योगदान मर्यादा १८०० इतकी करण्यात आली आहे
पात्र रकमेपैकी 100 टक्के निधी काढण्याची सुविधा मिळेल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सुमारे ८ कोटी सदस्यांसाठी काही मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार पीएफच्या योगदानाची मर्यादा ही आता १५०० वरून १८०० इतकी करण्यात आली आहे. दरम्यान पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया देखील अधिक सुलभ करण्यात आली आहे. या बदलांचा फायदा देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे..
नव्या नियमांनुसार, १५ हजार रुपयांपर्यंतच्या बेसिक सॅलरीवर १२ टक्के पीएफ योगदान अनिवार्य राहणार आहे. यानुसार कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचेही अनिवार्य योगदान १८०० रुपये इतके असेल. ज्या कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन १५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी अतिरिक्त पीएफ योगदान बंधनकारक राहणार नाही. मात्र, रिटायरमेंट नंतर अधिक आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी कर्मचारी स्वेच्छेने अतिरिक्त रक्कम पीएफ खात्यात जमा करू शकतील.
पीएफमधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी असलेल्या १३ वेगवेगळ्या श्रेणी कमी करून आता फक्त ३ प्रमुख श्रेणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती यांचा समावेश आहे. आजारपण, शिक्षण, विवाह, घर खरेदी किंवा बांधकाम यांसारख्या कारणांसाठी PF काढणे आता अधिक सोपे होणार आहे. EPFOच्या नव्या नियमांनुसार कर्मचारी पात्र रकमेपैकी 100 टक्के पैसे काढू शकतील. मात्र, खात्यातील एकूण योगदानापैकी किमान 25 टक्के रक्कम कायम ठेवणे आवश्यक असेल. निवृत्तीनंतर आर्थिक संरक्षण मिळावे हा या नियमामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते.
EPFOच्या नव्या नियमांनुसार कर्मचारी पात्र रकमेपैकी १०० टक्के पैसे काढू शकतील. मात्र, खात्यातील एकूण योगदानापैकी किमान २५ टक्के रक्कम कायम ठेवणे आवश्यक असेल. निवृत्तीनंतर आर्थिक संरक्षण मिळावे हा या नियमामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, नियोक्त्यांसाठीही नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. EPFO Scheme 2026 अंतर्गत प्रत्येक नियोक्त्याला १५ दिवसांच्या आत Form-V सादर करणे बंधनकारक असेल. या फॉर्ममध्ये आधार क्रमांक, पॅन क्रमांक, UAN क्रमांक, एकूण वेतन आणि EPF ची माहिती नमूद करावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.