EPFO Profile Photo Update chatgpt
बिझनेस

EPFO Alerts: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी हे काम कराच, नाहीतर पैसे अडकण्याची शक्यता

PF Claim : कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर तुमचे पैसे पीएफ खात्यात जमा करत असाल तर काही महत्त्वाच्या प्रोसेस करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला पीएफ काढताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सदस्य असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भविष्यात पीएफ काढणं, ई - नॉमिनेशन करणं किंवा इतर ऑनलाइन सेवा वापरणं सोपं व्हावं, यासाठी EPFO ने सदस्यांना प्रोफाइलवरचे फोटो अपडेट करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. प्रोफाइल फोटो नसेल तर काही ऑनलाइन प्रोसेस पूर्ण करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

EPFO च्या माहितीनुसार, प्रोफाइल फोटो हा कर्मचाऱ्याच्या डिजिटल ओळखीचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे ई-नॉमिनेशनसारख्या सेवांसाठी फोटो अपलोड केलेला असणं गरजेचं आहे. जर फोटो अपडेट नसेल, तर पीएफ क्लेमच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अडचणी येतील आणि वेळ लागू शकतो.

फक्त फोटोच नाही, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांसारख्या माहितीमध्ये अपडेट ठेवणं गरजेचं आहे. यामुळे पीएफ ट्रान्सफर, पैसे काढणे, पेन्शन आणि इतर ऑनलाइन सेवांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकतो.

EPFO पोर्टलवर प्रोफाइल फोटो कसा अपडेट कराल?

१. EPFO च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन १२ अंकी UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

२. पुढे होमपेजवर View या ऑप्शनवर क्लिक करून Profile हा पर्याय निवडा.

३. प्रोफाइल पेजवर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Change Photo या ऑप्शनवर क्लिक करा.

४. मोबाईल किंवा संगणकातून पासपोर्ट साइज डिजिटल फोटो निवडा.

५. आता फोटोचा प्रीव्ह्यू तपासल्यानंतर Upload Photograph वर क्लिक करा आणि OK करून संपूर्ण प्रोसेस पूर्ण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

Rahul Gandhi Protest: राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन चिघळलं, PHOTO

Wednesday Horoscope : संयम ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींचे कामाचे मार्ग मोकळे होणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT