EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO च्या नियमांमध्ये मोठे बदल; सरकारनं दिली नवी अपडेट

EPFO Update: सरकारने EPFO ​​3.0 अंतर्गत मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे. केंद्रीकृत पेन्शन प्रणाली (CPPS) आणि जलद स्वयंचलित दावा निपटारा प्रणाली सुरू केली आहे.

Bharat Jadhav

  • दर महिन्याला ७० लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होत आहे.

  • CPPS प्रणालीमुळे पेन्शन वेळेवर मिळणार.

  • ७० लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा.

सरकारने लोकसभेत कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत (EPFO) सुरू असलेल्या EPFO ​​3.0 सुधारणांविषयी सविस्तर माहिती दिली. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश प्रणालीला अधिक जलद, अधिक पारदर्शक आणि वापरकर्त्यासाठी सोयीस्कर बनवणे हा आहे. यामुळे क्ले सेटलमेंट करणं अधिक जलद आणि सोपं होणार आहे.

सर्वात मोठा बदल म्हणजे केंद्रीकृत निवृत्तीवेतन प्रदान प्रणाली (CPPS) सुरू करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून सर्व EPFO ​​क्षेत्रीय कार्यालयांनी ही प्रणाली पूर्णपणे स्वीकारली आहे. या नव्या सिस्टीममुळे दर महिन्याला ७० लाख पेक्षा जास्त पेन्शनधारक वेळवर आपली पेन्शन मिळवू शकत आहेत. नव्या सुधरणांमुळे चुका आणि पेन्शन मिळण्यास विलंब होत नाही. क्लेम करण्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षात, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, ५ लाख रुपयांपर्यंतचे एकूण ३५.२ दशलक्षाहून अधिक दावे स्वयंचलित पद्धतीने निकाली काढण्यात आले आहेत.

EPF अकाउंट ट्रांसफर होतो झटपट

नोकरी बदलल्यानंतर EPF अकाउंट ट्रांसफर करणं खूप सोपं झालं आहे. आधी या प्रक्रियेसाठी नियोक्त्याची मंजुरी आणि अनेक टप्प्यांची आवश्यकता होती, परंतु आता केवायसी (KYC) अपडेट केल्यावर ती आपोआप पूर्ण होते. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंदाजे ७.०५ दशलक्ष ऑटो-ट्रान्सफर दावे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय प्रक्रियाबद्ध करण्यात आले आहेत. नियोक्त्याच्या मदतीशिवाय कर्मचाऱ्यांनी स्वतः सादर केलेले २१ लाखांहून अधिक नोकरी बदलीचे क्लेम मंजूर करण्यात आलेत.

EPFO ​​३.० हे एक डिजिटल अपग्रेड वर्जन आहे, जे कागदपत्रांचे काम कमी करते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व ऑटोमेटेड असते. आधी क्लेम सेटलमेंटसाठी २० दिवस लागत होते. आता तेच काम फक्त तीन दिवसात पूर्ण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट

Wednesday Horoscope: गोड बोलून कामे होतील, ५ राशींचे नशीब फळफळणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्सुकता शिगेला; स्वामी स्वरुपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

Maharashtra Live News Update: साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

SCROLL FOR NEXT