EPFO PF withdrawal GOOGLE
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता PFचे पैसे थेट ATM मधून काढता येणार, तारीख आली समोर

EPFO Update: EPFO 3.0 अंतर्गत PF पैसे ATM आणि UPI द्वारे काढण्याची सुविधा येणार आहे. नवीन नियमांनुसार 75% रक्कमच काढता येणार असून ekyc अपडेट आवश्यक राहणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक व्यक्तीच्या खात्यातून पीएफचे पैसे जमा होत असतात. तुम्हाला रिटायरमेंट किंवा गरजेच्या वेळेस हा निधी खूप कामी येतो. EPFO 3.0 च्या अंतर्गत सगळ्याच कर्मचारी वर्गाला मोठा फायदा झाला आहे. कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या पीफचे पैसे ATM च्या मदतीने आणि UPIच्या मदतीने पैसे काढता येणार आहेत. पण कधी असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, याचीच माहिती समोर आली आहे.

पुर्वी EPFOच्या कर्मचाऱ्यांना बॅंकेत जाऊन लांबच्या लांब रांगा लावून PF चे पैसे मिळायचे. त्यात अनेक कागदपत्रांचा समावेश केला जायचा. आता तुम्हाला घरबसल्या मिनिटांतच ही प्रक्रिया करता येईल. तसेच मोठी बातमी म्हणजे तुम्हाला तुमचा PF हा ATM च्या मदतीने येत्या मे २०२६ अखेरपर्यंत पर्यंत काढता येईल अशी शक्यता आहे. यामध्ये काही महत्वाचे नियम आहेत.

सगळ्यात आधी लक्षात घ्या की, तुम्हाला तुम्हाला तुमच्या खात्यातून जमा रक्कमेच्या ७५ टक्के रक्कच काढता येईल. तसेच २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागेल. तसेच तुम्ही ५ लाखांपर्यंत ऑटो सेटलमेंट करु शकता. तसेच तुम्हाला UPIच्या मदतीने ही रक्कम काढता येईल.

Employees' Provident Fund Organisation (EPFO) च्या सदस्यांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यामध्ये तुम्हाला ekyc अपडेट करणं अनिवार्य राहणार आहे. तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवस पैसे खात्यात येण्यासाठी वाट पाहावी लागेल आणि आलेले पैसे तुम्हाला लगेचच काढता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT