PF New Rules 2026 meta ai
बिझनेस

EPFO 3.0 Big Update: PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 मध्ये UPI-ATMसह होणार ५ मोठे बदल; आता झटपट पैसे मिळणार

PF withdrawal : EPFO 3.0 अंतर्गत पीएफ सेवा डिजिटल होत असून UPI आणि ATM च्या मदतीने पैसे काढणे, ५ लाख ऑटो- सेटलमेंट, उमंग फेस ऑथेंटिकेशनसह अनेक सुविधा सदस्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

EPFO 3.0 Digital Reforms: तुम्ही तुमचा पीएफ कंपनीत जमा करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधि सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारकडून EPFOच्या डिजिटल व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येत असून EPFO 3.0 अंतर्गत पीएफशी संबंधिक अनेक सेवा जास्त जलद आणि डिजिटल होणार आहेत. यामुळे पीएफ क्लेमसाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

EPFOने आपल्या सदस्यांचा डेटाबेस केंद्रीकृत IT प्रणाली CITES प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर केला आहे. त्यामुळे देशभरातल्या सदस्यांसाठी एक केंद्रीकृत डेटाबेस तयार झाला असून पीएफ सेवांमध्ये जास्त सुलभता येणार आहे.

EPFO 3.0 मध्ये कोणते 5 मोठे बदल?

UPI आणि ATMद्वारे PF काढण्याची सुविधा

नियम आणि पात्रतेच्या अटी लागू राहून सदस्यांना त्यांच्या पात्र PF रकमेतील काही हिस्सा UPI किंवा UPI-सक्षम ATMच्या माध्यमातून काढण्याची सुविधा मिळणार आहे. UPI PINच्या मदतीने व्यवहार करता येईल.

ऑटो-सेटलमेंटची मर्यादा ₹5 लाख

EPFOने ऑटो-सेटलमेंटची मर्यादा ₹१ लाखांवरून ₹५ लाखांपर्यंत वाढवली आहे. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घराशी संबंधित गरजांसाठी पात्र क्लेम जलदगतीने प्रोसेस होऊ शकतील.

UMANG Appमध्ये Face Authentication

UMANG अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून UAN तयार किंवा अॅक्टीव्ह करा, पासबुक पाहा, माहिती दुरुस्त करा आणि ऑनलाइन क्लेम दाखल करणे जास्त सोपं होणार आहे.

क्लेम रिजेक्ट होण्याचे प्रमाण कमी होणार

नव्या डिजिटल व्यवस्थेत सदस्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार किती रक्कम काढण्यासाठी पात्र आहेत, याची माहिती आधीच दिसणार आहे. त्यामुळे चुकीच्या रकमेचा क्लेम दाखल होऊन तो रिजेक्ट होण्याची शक्यता कमी होईल.

ऑनलाइन स्पष्टीकरणाची सुविधा

क्लेम प्रक्रियेदरम्यान EPFO कार्यालयाला अतिरिक्त माहितीची गरज भासल्यास सदस्य ऑनलाइन पद्धतीने आवश्यक स्पष्टीकरण किंवा माहिती देऊ शकतील. दरम्यान, FY26 साठी EPF आणि VPF वर ८.२५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आला आहे. EPFO 3.0 मुळे PF व्यवस्थापन अधिक डिजिटल, जलद आणि सदस्यांसाठी सोयीस्कर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष सुविधा उपलब्धता, पात्रता आणि पैसे काढण्याच्या मर्यादा लागू नियमांनुसार ठरतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

Rajgad Tragedy : राजगडावर मोठी दुर्घटना! ट्रेंकिंग करताना तरुण अचानक कोसळला अन्...

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Cucumber : काकडी खाताना तुम्ही नकळत करताय 'ही' चूक, वेळीच ओळखा अन् गंभीर समस्यांपासून वाचा

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

SCROLL FOR NEXT