India government approves E100 ethanol fuel for flex-fuel vehicles saam tv
बिझनेस

E100 Ethanol : आता वाहन चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि CNG ची गरज नाही; इंधनाबाबत केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Government Approves E100 Ethanol : केंद्र सरकारने फ्लेक्स-फ्यूल वाहनांसाठी E100 इथेनॉल इंधनाचा समावेश करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली आहे. E85 सोबत E100 ला मान्यता मिळाल्याने पर्यायी इंधनाच्या वापराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारने E100 इथेनॉल इंधनाला दिली अधिकृत मान्यता

  • फ्लेक्स फ्यूल वाहनांसाठी मोटार वाहन नियमांत मोठा बदल

  • देशांतर्गत इथेनॉल वापर वाढल्यास कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे

केंद्र सरकारने 'फ्लेक्स-फ्यूल' वाहनांसाठी 'E100' इथेनॉल इंधनाला मान्यता देण्यासाठी 'सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स' (केंद्रीय मोटार वाहन नियम) मध्ये सुधारणा केलीय. रस्ते वाहतूक मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेमुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने 'सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स, १९८९' मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केलीय. फ्लेक्स-फ्यूल वाहनांसाठी 'E100' इथेनॉल इंधनाला अधिकृत मान्यता दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेद्वारे (G.S.R. 911(E)), नियम ११५ मध्ये बदल करण्यात आलेत. या नियमात पूर्वी केवळ 'E85' चा उल्लेख होता, परंतु आता त्यात 'E85' आणि 'E100' या दोन्ही इंधनांचा समावेश करण्यात आलाय.

दरम्यान सरकारचा हा निर्णय त्या कंपन्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्या कंपन्या E100 मॉडल लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, E85 आणि E100 इंधनांचा वापर केवळ विशेषतः डिझाइन केलेल्या आणि प्रमाणित 'फ्लेक्स-फ्यूल' वाहनांमध्येच केला जावा. E20 किंवा सामान्य पेट्रोलवर चालण्यासाठी डिझाइन केलेल्या सध्याच्या गाड्यांमध्ये ही इंधने वापरता येणार नाहीत. या घडामोडीमुळे इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन मिळेल, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणालाही फायदा होणार आहे.

नियमांमधील बदल काय आहेत?

नवीन नियमांनुसार, उत्सर्जनाशी संबंधित तरतुदींमध्ये E85 सोबत E100 चाही समावेश करण्यात आलाय. तक्त्यांमध्ये पेट्रोल संदर्भासाठी E10/E20 असे सुधारणा करण्यात आलीय. वाहनांच्या एकूण वजनाची (ग्रॉस व्हेईकल वेट) मर्यादा ३,००० किलोवरून वाढवून ३,५०० किलो करण्यात आलीय. बायोडीझेलसाठी, तरतूद B10 वरून B100 अशी अद्ययावत करण्यात आलीय. हायड्रोजन-सीएनजी (HCNG) संबंधित तांत्रिक सुधारणांचाही यात समावेश करण्यात आलाय. हे बदल मूळ उपकरण उत्पादकांकडून (OEMs) 'फ्लेक्स-फ्यूल' वाहने म्हणून डिझाइन केलेल्या वाहनांना लागू होतील.

कोणत्या वाहनांमध्ये वापरलं जाईल नवीन E100 इंधन

E85 किंवा E100 इंधनाचा वापर केवळ अशा वाहनांमध्येच केला पाहिजे, ज्यांना उत्पादकांनी उच्च इथेनॉल मिश्रित इंधनासाठी प्रमाणित केलंय. सामान्य पेट्रोल किंवा E20 मिश्रित इंधनासाठी डिझाइन केलेल्या गाड्यांमध्ये अशा इंधनाचा वापर केल्यास इंजिनचे नुकसान होऊ शकते. सध्याच्या वाहन मालकांना कोणत्याही बदलांची किंवा वाहन बदलण्याची गरज नाहीये. ब्राझील आणि युनायटेड स्टेट्ससारख्या देशांमध्ये 'फ्लेक्स-फ्यूल' (flex-fuel) तंत्रज्ञान आधीच वापरात आहे. तेथील वाहने एकाच इंधन टाकीचा वापर करून विविध मिश्रित इंधनांवर चालू शकतात.

वाहन कंपन्या आणि पर्यावरणावर काय परिणाम होणार

हे बदल अशा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील जे 'E100' मॉडेल्स (पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने) बाजारात आणण्याची प्लॅन आखत आहेत. इथेनॉलचा कार्बन फूटप्रिंट कमी असतो, ज्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन उत्सर्जनात घट होईल. तसेच ऊस आणि धान्यापासून इथेनॉलची निर्मिती होत असल्याने याचा फायदा कृषी क्षेत्रालाही होईल. कच्च्या तेलाची आयात कमी करणे. स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹१५०० की ₹३००० रुपये मिळणार? सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याबाबत राज्य सरकारचा उद्या घेणार मोठा निर्णय

भाजपमध्ये ५० वर्षांपासून असणाऱ्या दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: भांडुप रेल्वे स्थानकात AC लोकलच्या धडकेमुळे तरुणाचा मृत्यू

३० दिवस कॉफीऐवजी ग्रीन टी प्यायलात तर काय होतं? रिझल्ट एकदम जबरा

Health Tips : करपलेली किंवा जास्त भाजलेली चपाती खाल्ल्याने कर्करोगाचा धोका होतो का? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT