Jalgaon gold and silver rates on Dussehra 2026 saam tv
बिझनेस

Gold-Silver Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी झाली स्वस्त; जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या नवे दर

Gold Rate : दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने जळगावच्या सराफ बाजारात सकाळपासून ग्राहकांची गर्दी झाली.

Bharat Jadhav

  • जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली.

  • सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला

  • अनेक ग्राहकांनी दागिन्यांसोबत गुंतवणुकीच्या उद्देशानेही सोने खरेदी केले.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

जळगाव, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा सणाला सोने खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीत मोठी गर्दी पहावयास मिळाली. सोने खरेदीसाठी ग्राहकांनी आज सकाळपासून सराफ बाजारात गर्दी होती. दरम्‍यान सोने व चांदीच्‍या भावात घसरण झाल्‍याचा दिलासा देखील खरेदीदारांना मिळाल्‍याने अनेकांनी याचा फायदा घेत सोने खरेदी केले. यामुळे जळगावच्‍या सराफ बाजारात दिवसभरात कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाल्‍याचा अंदाज सराफ व्‍यावसायिकांकडून व्‍यक्‍त केला गेला.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसरा आज साजरा होतो. प्रामुख्‍याने दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने– चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा असून यामुळे अनेकांनी केवळ गुंतवणूक म्‍हणून सोने खरेदी केल्‍याचे चित्र सराफ बाजारात होते. दरम्‍यान गेल्‍या आठवड्याच्‍या सुरवातीपासून सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. आज देखील मोठा दिलासा असून आजच्‍या मुहूर्तावर सोने– चांदी खरेदी करण्याची संधी खरेदीदारांनी साधली.

गुंतवणुकीसाठी खरेदी

गतवर्षीच्‍या तुलनेत सोन्‍याचे दर यंदा वाढलेले आहेत. गतवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने १ लाख २० हजार रुपयांपर्यंत होते. ते आज १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. अर्थात गतवर्षीच्‍या तुलनेत २५ हजाराने दर वाढले असले तरी सोने मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्‍याने मोठी उलाढाल आज झाली आहे. प्रामुख्‍याने आपट्याची पाने, नेकलेस, मनी, कानातले झुमके खरेदीकडे अधिक कल होता. तर काहींनी केवळ गुंतवणूक म्‍हणून सोन्‍याची चिप खरेदी केली.

इन्‍फो सोने १८००, तर ४ हजाराने स्‍वस्‍त

दोन दिवस झाले सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. परंतु सोमवारी (ता. १९) सोने व चांदीच्‍या भावात काहीशी वाढ झाली होती. तुलनेत आजच्‍या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने व चांदीचे भावात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी (ता.१९) सोन्याचा भाव एक लाख ४६ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. यात आज (ता.२०) १८०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ४४ हजार ७०० रुपयापर्यंत खाली आले आहे.

तर चांदीच्या भावात तब्‍बल ४ हजार रुपयांची घसरण झाली. चांदीचे भाव दोन लाख १४ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर आले असताना आज चार हजार रुपयांनी कमी चांदी दोन लाख १० हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसऱ्यानंतर मिळणार खुशखबर! महागाई भत्ता 63% होण्याची शक्यता

Shivsena Dasara Melava live : शिवतीर्थावर कोणाकोणाची होणार भाषणे? पाहा यादी

Tea Vs Coffee: चहा की कॉफी सकाळी काय पिणे फायदेशीर?

Maharashtra News Live Update: दसऱ्याच्या सुट्टीत अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी जनतेला कोणतं वचन दिलं? दुष्काळावर काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT