SBI News Saam tv
बिझनेस

SBI News: तुमचं स्टेट बँकेत खातं आहे? मग तुम्ही ATM कार्डशिवाय काढू शकतात पैसे, जाणून घ्या पद्धत

SBI News: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणलीय.

Bharat Jadhav

SBI News:

UPI च्या माध्यमातून व्यवहार करण्यास सर्वाधिक पसंती दिली जातेय. परंतु काही कामांसाठी जे डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम लागते. अशा परिस्थितीत अनेकदा लोकांना रोख रकमेअभावी समस्यांना सामोरे जावे लागते. हात खर्चसाठी काहीजण रोख पैसे ठेवत असतात. आधीसारखं अनेकजण बँकेत स्लीप भरून पैसे न काढता एटीएममधून पैसे काढत असतात. (Latest News)

पण एटीएम कार्ड नसल्यास अडचणी येत असतात. कारण बँकेत जाऊन स्लीप भरून पैसे काढण्यसाठी तासन् तास रांगेत उभे राहवे लागते. बऱ्याचदा स्लीप भरण्यासाठी अनेकांकडे बॉल पेन नसतो. यामुळे एटीएमने पैसे काढण्याच्या पर्यायाकडे अनेकांचा कल असतो. परंत एटीएमच नसेल तर. कधी-कधी एटीएम राहूनही पैसे निघत नाहीत. ही समस्या संपवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले YONO अॅप UPI शी लिंक केलय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योनो अॅपच्या माध्यमातून आता क्रेडिट कार्डशिवायही एटीएममधून सहज पैसे काढता येणार आहेत. या फीचरला इंटर पेएबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल असं म्हटलं जातं. ही सुविधा सर्व एटीएमवर उपलब्ध आहे. या नवीन फीचरमुळे एटीएम कार्डच्या क्लोनिंगमुळे होणारी फसवणूक रोखता येणं शक्य होणार आहे.

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे?

  • तुमच्या फोनमध्ये योनो अॅप ओपन करा.

  • ‘कॅश विथड्रॉवल’ पर्याय निवडा.

  • किती रोख रक्कम काढायची आहे ते भरा.

  • यानंतर एटीएम निवडा.

  • आता एक QR कोड जनरेट होईल.

  • तुम्हाला QR कोड स्कॅन करावा लागेल.

  • QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा UPI आयडी आणि UPI पिन टाकावा लागेल.

  • UPI पिन टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes and Sweets: साखरेऐवजी गूळ वापरून मिठाई खाताय? थांबा! मधुमेही रुग्णांसाठी हा पर्यायही ठरू शकतो धोकादायक

Maharashtra News Live Update: जालन्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

Soft Glam Makeup: सणासुदी ते लग्नसराईपर्यंत ट्राय करा सॉफ्ट ग्लॅम मेकअप; दिसाल सगळ्यात सुंदर आणि आकर्षक!

Pune Hapus Price: फळांचा राजा पुण्यात दाखल, हापूस आंब्याची १ पेटी ४१,००० रुपयांना

Jio Offers : जिओचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च! तब्बल ३ वर्ष चालणार, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् भरपूर फायदे; किंमतही समोर

SCROLL FOR NEXT