DA Hike 2026 saam tv
बिझनेस

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA वाढीची घोषणा कधी होणार? पुढच्या आठवड्यात काय घडणार?

Central Government Employees : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष आता महागाई भत्ता वाढीकडे लागलं आहे. २१ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला नाही.

Sakshi Sunil Jadhav

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढीची वाट पाहत आहेत. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. पण या बैठकीत निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पुढच्या आठवड्यात DA वाढीची घोषणा होणार?

केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई राहत (DR) यामध्ये सुधारणा करते. ही वाढ अनुक्रमे १ जानेवारी आणि १ जुलैपासून लागू केली जाते. जानेवारीच्या वाढीची घोषणा मार्च किंवा एप्रिलमध्ये, तर जुलैच्या वाढीची घोषणा बऱ्याचदा सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये केली जाते.

यंदा ऑक्टोबरमध्ये घोषणा होण्याची अपेक्षा होती. पण २१ ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णन घेतला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागतेय. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाची नियमित बैठक होण्याची शक्यता असली, तरी DA वाढीची घोषणा नेमकी कधी होणार, याबद्दल अजून तारीख ठरेलेली नाही.

DA वाढीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे का?

महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यासाठी दरवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीची गरज असतेच असं नाही. वित्त मंत्रालयाकडूनही यासंदर्भातल्या घोषणा केल्या जाऊ शकतात. मात्र मागच्या काही वर्षात बऱ्याचदा मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे.

याआधी किती वाढ झाली होती?

एप्रिल २०२६ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मध्ये २ टक्क्यांची वाढ मंजूर केली होती. त्यामुळे महागाई भत्त्याचा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली होती.

मागील वर्षांतल्या DA घोषणेच्या तारखा

२०२५ - १ ऑक्टोबर

२०२४ - १६ ऑक्टोबर

२०२३ - १८ ऑक्टोबर

२०२२ - २८ सप्टेंबर

२०२१ - २१ ऑक्टोबर

मागच्या वर्षांचा विचार करता, जुलैच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये झाल्याचं दिसतं. त्यामुळे यंदाही कर्मचाऱ्यांना लवकरच निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारची अधिकृत घोषणा होईपर्यंत वाढीची टक्केवारी आणि तारीख पक्की समजू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer News : सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra News Live Update: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Winter Wardrobe : हिवाळ्याचे कपडे बाहेर काढण्यापूर्वी करा ही ५ कामे, स्वच्छता ते साठवणुकीपर्यंत या टिप्स उपयुक्त ठरतील

Epilepsy : फिट आल्यावर लगेच करा 'हे' काम, वाचू शकतो रुग्णाचा जीव

Loose Motion: जुलाब झाल्यानंतर कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT