DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: महत्त्वाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ; कितीने वाढणार पगार?

DA Hike News: केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्याबाबत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. दरवर्षी दोन वेळा महागाई भत्ता वाढतो. जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढला आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची कर्मचारी वाट पाहत आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करु शकतात. प्रत्येक वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते. त्यानंतर जुलै महिन्यात दुसऱ्यांदा वाढ होते. त्यामुळे आता जुलै महिना सुरु झाला आहे. यामुळे महागाई भत्त्यात कधी वाढ होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता मिळाला आहे. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार याची वाट कर्मचारी बघत आहेत.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणारा हा शेवटचा महागाई भत्ता असू शकतो. २०२६ मध्ये ८वा वेतन आयोग करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या महागाई भत्त्यात कितीने वाढ होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

किती वाढणार महागाई भत्ता? (DA Hike)

जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. यावेळी जुलै महिन्यात DA/DR मध्ये ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. या महागाई भत्त्यात वाढ होईन ५८ टक्के होऊ शकते. परंतु याबाबत अजून निर्णय घ्यायचा आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार? (When Will Dearness Allowance Implemented)

महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. परंतु याबाबतची घोषणा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जुलै महिन्यापासून जरी महागाई भत्ता लागू होणार असला तरीही त्याची घोषणा होण्यासाठी अजून वेळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा केली जाते. त्यांना त्या महिन्यात जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्याची वाढ करुन दिली जाते.

महागाई भत्ता कसा ठरवला जातो?

७व्या वेतन आयोगानुसार मागील सहा महिन्याच्या AICPI-W च्या आकडेवारीनुसार भत्ता महागाई भत्ता ठरवला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारानुसार पगारात वाढ केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT