Debit-Credit  Saam Tv
बिझनेस

Debit-Credit कार्डवर असणारा CVV आणि CVC नेहमी सिक्रेट ठेवायला का सांगतात? त्याचे कारण काय?

CVV And CVC Is Important For Online Payment : बरेचदा आपल्याला डेबिट-क्रेडिट कार्डवर असणारा CVV आणि CVC हा नेहमी सिक्रेट ठेवायला सांगितला जातो. पण असे का? यामागचे कारण काय? जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Debit Card Secret Tips :

बँकेत खाते उघडल्यानंतर बँक आपल्याला काही सुविधा पुरवते. त्यातील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे डेबिट-क्रेडिट कार्ड. या कार्डमुळे आपले जगणे सोपे होते. तसेच गरज पडल्यास आपण कधीही, कुठेही आणि केव्हाही रक्कम काढू शकतो.

सध्याच्या वाढत्या डिजिटलाझेशनच्या युगात डेबिट कार्डला अधिक महत्त्व आहे. जर तुम्हाला UPI वापरायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु, बरेचदा आपल्याला डेबिट-क्रेडिट कार्डवर (Credit Card) असणारा CVV आणि CVC हा नेहमी सिक्रेट ठेवायला सांगितला जातो. पण असे का? यामागचे कारण काय? जाणून घेऊया.

1. CVV नंबर म्हणजे काय?

क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या मागे एक पट्टी असते. त्या पट्टीच्या शेवटी ३ अंकी क्रमांक लिहिलेला असतो. या क्रमांकाला CVV क्रमांक असे म्हटले जाते. CVV क्रमांक म्हणजे कार्ड पडताळणी मूल्य. याद्वारे बँकेतून एक नेटवर्क तयार केला जातो.

प्रत्येक कार्ड नेटवर्क हे वेगळ्या प्रकारे ऑफर (Offer) करते. यामध्ये मास्टरकार्ड CVV कोड CVC2 आणि VISA CVV2 म्हणून असते. यासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जातात. ऑनलाइन पेमेंट करताना हा नंबर कोड म्हणून टाकाला जातो.

जर तुमच्या कार्डशी कोणीही छेडछाड करत असेल तर CVV नंबरशिवाय कोणतेही पेमेंट करु शकत नाही. याचा अर्थ असा की, ऑनलाइन पेमेंटसाठी CVV क्रमांक असणे गरजेचे आहे. यापूर्वी CVV नंबरच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट (Payment) केले जात होते. परंतु, वाढत्या फसवणूकीमुळे सुरक्षिततेसाठी OTP पिन तयार करण्यात आला. त्यामुळे ऑनलाइन खरेदीसाठी OTP असणे आवश्यक आहे. तसेच RBI ने आता ऑनलाइन खरेदीच्या सुरक्षिततेसाठी 3D सुरक्षित पासर्वड अनिवार्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT