LPG Cylinder Price Saam Tv
बिझनेस

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, ४ महिन्यात ₹५०० ने महागला

Commercial gas cylinder hike Update April : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा ₹310 ची वाढ झाली असून गेल्या 4 महिन्यांत जवळपास ₹500 ने दर वाढले आहेत. याचा हॉटेल आणि अन्नदरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

LPG commercial cylinder price hike April 2026 India details : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलो वजनाचा एलजीपी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ३१० रूपयांची वाढ केली आहे. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील जेवण महागण्याची चिन्हे आहेत. आधीच गॅस टचांईने त्रस्त नागरिकांना आता दरवाढीचा फटकाही बसणार आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडर आणि विमान इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या (ATF) दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

महिनाभरापासून इराण-इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगभरात महागाईचा भडका वाढलेला आहे. त्यातच आता १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. दिलासादायक म्हणजे, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ मार्च रोजी वाढ करण्यात आली होती.

इंडियन ऑइल (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी आज १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ३१० रुपयांची वाढ केली आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आता गॅस सिलिंडरची किंमत २,०३१ रूपये झाली आहे. तर राजधानी दिल्लीत या सिलिंडर २०७८.५० रुपयांना मिळणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरची किंमत आधी १७६८.५० रुपये होती. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOC) वेबसाइटनुसार, नवी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ₹२,०७८.५० झाली आहे. कोलकातामध्ये ₹२,२०८.०० तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर ₹२,२४६.५० रूपयांना मिळणार आहे.

१९ किलो वजनाच्या व्यावसाकिय गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. याआधी १ मार्च रोजी सिलिंडरच्या दरात २८ रुपयांची वाढ झाली होती. १ फेब्रुवारीपासून ४९ रुपयांची तर १ जानेवारीपासून १११ रुपयांची वाढ झाली होती. म्हणजेच २०२६ वर्षातील पहिल्या चार महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ४९८ रुपयांनी वाढली आहे.दिलासादायक म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नोंदवण्यात आलेली नाही. ७ मार्च रोजी १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरात ६० रूपयांची वाढ कऱण्यात आली होती. आज हे दर स्थिर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Jaggery Benefits: पूर्वी बाहेरुन आल्यावर पाहुण्यांना गूळ पाणी का द्यायचे? काय आहेत गूळ पाण्याचे फायदे?

हवेत भिरकावलं, चिमुकल्याला आपटलं; रिक्षाचालकाच्या विकृतीचा कळस

संतप्त गावकऱ्यांचा भोंदूबाबाला चोप, गावकऱ्यांनी कशी घडवली अद्दल? VIDEO

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

SCROLL FOR NEXT