Petrol Diesel Rate (9th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (9th January): गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त, महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Petrol Diesel Price Today 9th January 2024: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

देशात नवीन तेलसाठा सापडला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. "काकीनाडा किनार्‍यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कृष्णा गोदावरी खोऱ्यात काल पहिल्यांदा तेल (Oil) काढण्यात आले.

आज WTI क्रूड कमी झाले असून प्रति बॅरल $ 70.94 वर विकले जात आहे. ब्रेंट क्रूड $ 2.64 च्या घसरणीसह प्रति बॅरल $ 76.12 वर व्यापार करत आहे. निवडणूकीपूर्वी इंधनाच्या किंमतीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात 56 पैशांनी घट झाली आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल 52 पैशांनी महागले आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

1. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

  • नवी दिल्लीत पेट्रोल (Petrol) 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल (Diesel) 94.33 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.96 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.48 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.06 रुपये आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT