Airtel Recharge Social Media
बिझनेस

Airtel चा सर्वात मोठा प्लान; Netflix साठी अतिरिक्त पैसा खर्च करण्याची गरज नाही; काय आहे नवीन ऑफर

Airtel Recharge : एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन सुरू केले आहेत. स्वस्त आणि महाग अशा दोन्ही प्रकारचे प्लान तुम्ही घेऊ शकतात. विशेष म्हणजे एअरटेल कंपनीचा एक प्लान देखील आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्री नेटफ्लिक्ससह फ्री कॉलिंग, डेटाचा लाभ मिळतो.

Bharat Jadhav

Airtel 3GB Data Recharge Plan:

रिलायन्स जिओनंतर एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल कंपनीचे सध्या ३७ कोटींहून अधिक युझर्स आहेत. कंपनी आपल्या 5G नेटवर्क वर काम करत आहे. या नेटवर्कमुळे युझर्सला चांगली कनेक्टिव्ही मिळेल. आज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन सुरू केले आहेत. एअरटेलने आपल्या रिचार्ज प्लान अनेक श्रेणींमध्ये विभागले आहे.(Latest News)

यामध्ये अनलिमिटेड पॅक, डेटा पॅक, टॉकटाइम पॅक, एंटरटेनमेंट पॅक यांचा समावेश आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दीर्घ वैधता प्लानचाही समावेश केला आहे. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि दीर्घ वैधता, डेटा आणि OTT चे फायदे देणारा प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज आपण अशा प्लानबद्दल माहिती देणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एअरटेलच्या लिस्टमध्ये १,४९९ रुपयांचा प्लान आहे. हा प्रीपेड प्लॅन थोडा महाग आहे पण त्यात तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतील. जर तुम्ही हा प्लान घेतला तर तुम्हाला ८४ दिवसांची दीर्घ वैधता मिळेल. तुम्ही या ८४ दिवसात कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये डेटा ८४ दिवसांसाठी एकूण २५२ GB डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही दररोज ३GB डेटा वापरू शकता. जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल तर तुम्ही या प्लॅनसाठी जाऊ शकता.

जर तुम्ही OTT स्ट्रीमिंग करत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी खूप खास आहे. नेटफ्लिक्ससाठी तुम्ही अतिरिक्त पैसे खर्च करत असाल तर एअरटेलचा हा रिचार्ज प्लान तुमचे पैसे वाचवणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळेल. रिचार्जमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचा फक्त बेसिक प्लॅन मिळेल, हे मात्र लक्षात ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT