HSRP Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Plate: कार रजिस्ट्रेशन एका शहरात अन् राहायला दुसऱ्या शहरात? HRSP नंबरप्लेटबाबत फडणवीस सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

HSRP Number Plate: राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. मात्र, अनेकदा आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन हे दुसऱ्या शहरात असते अन् आपण वेगळ्याच शहरात राहतो. अशा वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी (HSRP) नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असणार आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी काही दिवसांचीच मुदत आहे. त्यामुळे या नंबरप्लेटसाठी वाहनधारकांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेकदा आपण राहतो एका शहरात आणि वाहन हे आपल्या गावी किंवा दुसऱ्या शहरात रजिस्टर (Registration) असते.

त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी रजिस्ट्रेशन असलेल्या शहरात जावे लागणार होते. मात्र, हा त्रास वाचावा म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात (Pune) राहणाऱ्या वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे वाहनधारक पुणे शहरातील नोंदणी केंद्र निवडू शकतात.

देशातील वाहन कंपन्यांना २०१९ पासून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट देणे अनिवार्य केले आहे. मात्र, ज्यांनी २०१९ पूर्वी वाहन खरेदी केल्या आहेत त्यांनादेखील ही नंबरप्लेट (Vehicle Number Plate) बसवणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर एचएआरपी प्लेट बसवू शकतात.

पुण्यात (Pune News)२५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत एक लाख ४२ हजार वाहनांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ३२ हजार वाहनांना या नंबरप्लेट बसवल्यादेखील आहेत.

पुण्यात जवळपास २५ लाख वाहनांना या नंबर प्लेट बसवायच्या आहेत. पुण्यात ही नंबर प्लेट बसवण्यासाठी १२५ केंद्रे आहेत.पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामासाठी वेळ जात आहे. सध्या दिवसाला पाच-सहा हजार वाहनांची नोंदणी केली जात आहे. एक ते दीड हजार वाहनांच्या नंबर प्लेट लावल्या आहेत.त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. हे काम करण्यासाठी पुढची दोन वर्षे लागू शकतात, अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

SCROLL FOR NEXT