PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: नवरा-बायको दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? वाचा नियम काय सांगतो

PM Kisan Yojana Rule: पीएम किसान योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. ३ हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. पुढच्या महिन्यात या योजनेचा १९वा हप्ता येऊ शकतो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. (PM Kisan Yojana Rules)

पीएम किसान योजनेचा लाभ जर पती पत्नी दोघेही घेऊ शकतात?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन २ हेक्टरपर्यंत आहे. त्याचसोबत शेतीयोग्य जमीन असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमिनीची नोंदणी आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांनुसार, या योजनेत जर एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही लाभ घेऊ शकत नाही. फक्त ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

पुढचा हप्ता कधी येणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो.दर चार महिन्यानी या योजनेचा हप्ता दिला जातो. मागचा १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला गेला होता. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतात. त्यासाठी तुम्ही डीबीटी करणे खूप गरजेचे आहे. याचसोबत तुम्हाला केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT