Business Idea In Marathi
Business Idea In Marathi Saam tv
बिझनेस

Business Idea In Marathi : चमचमीत पदार्थ बनवता येताय? मग महिन्याला कमवू शकता लाखो रुपये; फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक करा

कोमल दामुद्रे

Business Idea For Women :

वाढती महागाई आणि नोकरीच्या नव्या न मिळणाऱ्या संधीमुळे अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये महिला आणि पुरुष या दोघांचाही समावेश आहे.

अशातच सध्या पैसे कमवाण्याचे मार्ग देखील बदले आहे. अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते. अनेक जण नोकरीच्या माध्यमातून पैसे कमवातात. परंतु, जर तुमच्यात असणाऱ्या कलागुणांना योग्य प्रकारे न्याय दिल्यास तुम्ही देखील महिन्याला ५० ते ६० हजार रुपये कमावू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज आम्ही तुम्हाला अशा काही बिझेनस (Business) आयडीया सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही मालामाल व्हाल. अंत्यत कमी गुंतवणुकीत (Investment) केटरिंग व्यवसाय सुरु करु शकता. जर तुम्हाला चमचमीत पदार्थ करुन खाऊ घालता येत असतील तर तुम्ही केटरिंगचा व्यवसाय सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला १० हजार रुपयांची (Money) गुंतवणूक करावी लागेल.

केटरिंगचा व्यवसाय कधीही आणि कुठूनही करता येऊ शकतो. यासाठी तुम्ही सर्वात आधी रेशन आणि पॅकेजिंगवर अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच जेवण बनवताना अनेकांना स्वच्छता लागते. त्यासाठी तुम्ही चांगले आणि योग्य प्रकारचा आहार द्या.

हा व्यवसाय सुरु करताना तुम्हाला भांडी, गॅस सिलिंडर आणि मजूर देखील लागतील. या व्यवसायासाठी तुम्हाला बजेटची गरज नाही. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला २५ ते ३० हजार रुपये मिळू शकता.

व्यवसाय सुरु करताना मार्केटविषयी देखील माहित असायला हवे. व्यवसाय करताना केटरिंग विषयी अनुभव असायला हवा. तसेच तुम्ही कोणत्या प्रकारे अन्नपदार्थ बनवताय ते लोकांपर्यंत पोहोचू द्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींना नव्या व्यवसायाबद्दल सांगा. ज्यामुळे तुमच्याकडे ऑर्डर येऊ लागतील.

आजकाल घरात प्रत्येक छोट्या-मोठ्या फंक्शनसाठी बाहेरुन जेवण ऑर्डर केले जाते. तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षात अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन असते. जर तुम्ही या काळात बिझनेस सुरु केला तर लाखो रुपये सहज कमावू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT