Budget 2025 Session LIVE Updates 
बिझनेस

Budget 2025 Announcements Live Updates : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं?

Budget 2025 Session LIVE Updates Arthsankalp News :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Namdeo Kumbhar

१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं? सोप्या भाषेत घ्या जाणून

बजेट 2025मध्ये व्हिसाबाबत मोठी घोषणा | Announcement About Visa In Budget 2025

Budget 2025 Announcements Live Updates : १२ लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही - मोदी सरकारची मोठी घोषणा

१२ लाख रूपयांपर्तंचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्माला सितारामन यांनी घोषणा केली. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना मोठं गिफ्ट दिलेय.

१८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के टॅक्स

Union Budget 2025 Live updates आयकर भरण्यासाठीची मर्यादा ४ वर्ष, मोदी सरकारची मोठी घोषणा

Budget 2025 Announcements Live Updates ज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा एक लाखांवर

Budget 2025 Announcements News LIVE चामड्याद्वारे तयार होणाऱ्या वस्तू स्वस्त , मरिन प्रॉडक्ट्सवरील ड्युटी हटवली

Parliament Budget 2025 Session LIVE प्लॅट पॅनेल डिस्पेलवरील कर १० टक्क्यांवरून २० टक्के

Parliament Budget 2025 Session LIVE काय काय स्वस्त झालं?

कस्टम ड्युटीतून ३६ महत्त्वाची औषधं वगळली

ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी लागणारा माल स्वस्त

टिव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार

मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील

लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार

मोबाईल फोन स्वस्त होणार

भारतात तयार केलेले कपडे स्वस्त होणार

चामड्याद्वारे तयार होणाऱ्या वस्तू स्वस्त

मरिन प्रॉडक्ट्सवरील ड्युटी हटवली

एलईडी, एलसीडी टीव्ही स्वस्त होणार

मुलांची खेळणी होणार

Union Budget 2025 Live updates विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता

जल जीवन मिशन योजना २०२८ पर्यत वाढवण्याची घोषणा करताना आनंद होत आहे, याच्या एकूण खर्चातही वाढ होईल.
अर्थमंत्री

Budget 2025 Announcements Live Updates :  पुढील आठवड्यात नवे आयकर विधेयक मांडणार - अर्थमंत्री

Parliament Budget 2025 Session LIVE व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार,भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या सहज व्हिसा मिळणार

Arthsankalp 2025 LIVE updates : पीएम स्वनिधि योजनेचा आतापर्यंत 60 लाख फेरीवाल्यांना फायदा झालाय. या योजनेअंतर्गंत त्यांना लोन मिळते. या योजनेतील कर्जाची मर्यादा 30 लाखांवर वाढण्याचा प्रस्ताव आहे.

Budget 2025 Announcements News LIVE : २०२५ मध्ये आणखी ४० हजार नागरिकांचे गृह स्वप्न पूर्ण होणार

Budget 2025 News LIVE उडान योजना नव्याने स्थापन, पुढील १० वर्षांत १२० नवी ठिकाणं जोडली जाणार

Budget 2025 Announcements News LIVE :  एससी आणि एसटीला 5 वर्षांसाठी टर्म लोन देण्याचा प्रस्ताव - अर्थमंत्री

अनुसूचित जाती आणि आदिवासींना पाच वर्षांसाठी टर्म लोन देण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय छोट्या उद्योगासाठी कर्जाची मर्यादा 5 कोटी वरून 10 कोटी इतकी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्‍यांनी केली.

Budget 2025 Live छोट्या उद्योगाना चालना देण्यासाठी सरकारच्या योजना

Budget 2025 Announcements Live Updates :  

स्टार्टअपसाठीची मर्यादा १० कोटींहून २० कोटी इतकी करण्यात येत आहे. लहान उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड ५ लाखांपर्यंतची मर्यादा

Budget 2025 Announcements Live Updates :  किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत - अर्थमंत्री

शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेची घोषणा अर्थमंत्र्‍यांकडून कऱण्यातस आली. सरकार ही योजना राज्यासोबत चालवेल. १.७ कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा होईल, असे अर्थमंत्र्‍यांनी सांगितले. गरीब, तरूण, महिला, शेतकर्‍यांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रीत करणारा अर्थसंकल्प असेल, असे सितारामन यांनमी सांगितले. शेतीच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करू, ग्रामीण विकास, उत्पादन लक्षात आले आहे. तसेच, आम्ही आर्थिक क्षेत्राच्या सुधारणेकडे लक्ष देऊ. १०० जिल्ह्यांमध्ये धन धन्या योजना सुरू केली जात आहेत. तसेच, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढली आहे.

Budget 2025 Announcements News LIVE :  पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा

राज्याच्या मदतीने ही योजना राबवली जाणार.. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल.

१०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार.. राज्याच्या मदतीने ही योजना देशभरात राबवली जाणार

Budget 2025 Announcements Live Updates: जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान - अर्थमंत्री

देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प

जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान

देशाला प्रगतीकडे नेणं हेचं आमचं लक्ष

सबका विकास हेच आमचं उद्धिष्ठ

Budget 2025 LIVE : बजेटआधी सभागृहात विरोधकांचा गोंधळ

Budget 2025 Announcements Live : बजेट सादर करण्यापूर्वी विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. अखिलेश यादव यांच्यासह विरोधीपक्षातील नेत्यांनी आपला विरोध दर्शवला.

Budget Expectations 2025 live :  कॅबिनेट बैठकीत काय म्हणाले मोदी?

आज सादर होणारे बजेट हे सामान्य माणसासाठी असेल. गरीब शेतकरी, महिला आणि तरूण यांच्या आकांक्षाचे हे बजेट आहे. हे ज्ञानाचे बजेट आहे (गरीब, तरुण, अन्नदाता आणि महिला शक्ती).

कॅबिनेटमध्ये बजेटला मंजूरी, ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार

केंद्रीय मंत्रिमंडाळातून बजेटला मंजूरी देण्यात आली आहे. ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Budget 2025 Announcements News LIVE :  काऊंटडाऊन सुरू, निर्मला सितारामन संसदेत दाखल, थोड्याच वेळात बजेट मांडणार

Union Budget Expectations 2025 live : शेअर बाजाराची सावध सुरूवात

अर्थमंत्री निर्मला सितारामन आजअर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटच्या आधी शेअर बाजारात सकारात्मक सुरूवात झाली आहे. निफ्टी २० तर सेन्सेक्स ५० अंकांच्या वाढीसह उघडलाय.

Budget 2025 Announcements Live Updates

अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. 2014 नंतर कदाचित हे पहिलेच संसदीय अधिवेशन असेल जिथे अधिवेशनापूर्वी परकीय स्रोतांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. गेल्या 10 वर्षांपासून प्रत्येक अधिवेशनापूर्वी सातत्याने गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून वातावरण भडकवण्यास तयार असलेल्या लोकांची कमतरता नाही अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. तथापि, गेल्या दशकातील हे पहिलेच अधिवेशन आहे जिथे कोणत्याही बाह्य कोन्यातून असा गदारोळ माजवला गेला नाही असेही त्यांनी सांगितले.

Budget 2025 Announcements News LIVE : १०.३० वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

बजेट सादर करण्यापूर्वी सकाळी साडे दहा वाजता सभागृहात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पला मंजुरी मिळेल. अर्थसंकल्पाची प्रत संसदेच्या सभागृहात पोहोचली आहे.

Union budget expectations 2025 LIVE : थोड्याच वेळात होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामन राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहचणार आहेत. बजेट सादर होण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

Union Budget 2025 Live updates : निर्मला सितारामन राष्ट्रपती भवनाकडे रवाना

निर्मला सितारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्या राष्ट्रपतींची परवानगी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाला आहे.

Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या कुटुंबात कोण कोण आहे?

LPG Price Today : बजेटआधी दिलासा, LPG सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर

LPG Gas Cylinder New Rate : अर्थमंत्रि निर्मला सितारमन आज २०२५-२६ वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचं याकडे लक्ष लागलेय. पण त्याआधीच एक दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ७ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

आर्थिक सर्वेक्षणातील ७ महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्व्हेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली आहे. आगामी आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.३ टक्के ते ६.८ टक्के होण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. सात मुद्दे वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Budget 2025 Session LIVE  : बजेटमध्ये 10 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स नाही?

अर्थमंत्री निर्मला सितारमन आज बजेट सादर करणार आहेत. त्यांच्याकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. १० लाखांपर्यतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११ वाजता अर्थमंत्रि बजेट सादर करतील.

Union Budget 2025 Live updates : बजेटआधी पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशातील नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सांगितलं.

Nirmala Sitharaman Live Update : निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Budget 2025 Expectations Live : अर्थमंत्र्यांच्या पोटाऱ्यातून काय निघणार? कुणाला फायदा ?

Budget 2025 Session LIVE Updates Arthsankalp News :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी ३.० सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असेल. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा पुढील पाच वर्षांचा काय नियोजन असेल, याची झलक यामधून दिसेल. केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT