ATAL Pension Scheme Saam Digital
बिझनेस

ATAL Pension Scheme : ५.३ कोटी पेन्शनधारकांना मिळणार मोठं गिफ्ट, दरमहिना ७००० रुपये मिळण्याची शक्यता

Atal Pension Yojana: १ फ्रेब्रुवारीला देशाचे नवीन अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. यात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. त्यात अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget 2024 Atal Pension Yojana:

१ फ्रेब्रुवारीला देशाचे नवीन अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. यात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. त्यात अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.या अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेचा निधी वाढवू शकतो. त्यामुळे पेन्शनधारकांना मिळणारी रक्कमदेखील वाढू शकते. (Latest News)

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटने सरकारला पत्र लिहून अटल पेन्शन योजनेचा निधी वाढवण्याची शिफारस केला आहे. PFDRA नुसार, या योजनेत मिळणारे पैसे वाढवण्याची आवश्यता आहे. सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ५ हजारांहून वाढवून ७ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईचा अंदाज घेऊन हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ जवळपास ५.३ कोटी लोक घेत आहेत. मनी कंट्रोलने याबाबत वृत्त दिलं आहे.

वयाच्या ६० वर्षानंतर आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन २०१५-१६ मध्ये अटल पेन्शन योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेद्वारे सरकार सामान्य लोकांना सेव्हिंग करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटद्वारे चालवली जाते.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दर महिना १ हजार ते ५ हजार पेन्शन मिळते. ही योजना पेन्शनच्या रकमेवरही गुंतवणूकीवर अवलंबून असते. अटल पेन्शन योजना १८ ते ४० वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT