UPI Payment Charges Scrapped meta ai
बिझनेस

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

UPI Payment Charges Scrapped: UPI आणि RuPay वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. २,००० पर्यंतच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारता येणार नाही. RuPay डेबिट कार्ड पेमेंटवरही अतिरिक्त शुल्क घेण्यास सरकारने बंदी घातली आहे.

Sakshi Sunil Jadhav

UPI Payment Rules: डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता २,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. तसेच RuPay डेबिट कार्डच्या मदतीने केलेल्या पेमेंटवरही शुल्क लावायला बंदी केली आहे.

त्यामुळे UPI आणि RuPay वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी Payment and Settlement Systems Act, २००७ मधले कलम १०A अंतर्गत यासंदर्भात अधिसूचना जारी केली. या नियमानुसार, संबंधित व्यवहार करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून बँक किंवा पेमेंट सिस्टम थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतंही शुल्क आकारू शकणार नाही.

या नव्या नियमामुळे २,००० रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार पूर्णपणे शुल्कमुक्त राहतील. तसेच RuPay डेबिट कार्ड पेमेंटवरही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही.

मात्र, २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांबद्दल भविष्यात शुल्क लागू होण्याची शक्यता कायम आहे. सध्या Merchant Discount Rate (MDR) लागू करण्यात आलेले नाही. ऑगस्टमध्ये सरकारने मोठ्या व्यापारी UPI व्यवहारांवर मर्यादित स्वरुपात नाममात्र MDR लागू करण्याची शक्यता व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत हे शुल्क ग्राहकांऐवजी व्यापाऱ्यांकडून वसूल केले जाण्याची शक्यता असून "Person-to-Person" व्यवहार मोफत ठेवण्याचा विचार आहे.

दरम्यान भारतातील UPI व्यवहारांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. ऑगस्टमध्ये UPI वर २४.५१ अब्ज व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत २९.८२ लाख कोटी रुपये होती. Google Pay आणि PhonePe या दोन प्लॅटफॉर्मचा व्यवहारांमध्ये मोठा वाटा आहे.सरकारच्या मते, या बदलांचा उद्देश देशातल्या डिजिटल पेमेंट व्यवस्था जास्त सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या टिकाऊ बनवणे हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT