Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीनंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल ६६ लाख अर्ज बाद झाले आहेत. आता १.७७ कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana latest update : ईकेवायसी प्रक्रिया संपल्यानंतर'लाडकी बहीण योजने'मध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या कडक छाननीनंतर तब्बल ६६ लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा १० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1 कोटी 77 लाख पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

६६ लाख अर्ज बाद, १.७७ कोटी महिला पात्र

ईकेवायीनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर ६६ लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ १ कोटी ७७ लाख पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यात सरकारला यश आले आहे.

मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात?

मिळालेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर एकाचवेळी ३ हजार रूपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू

Akola By-poll: अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT