Big Rule Changes From October 1 meta ai
बिझनेस

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Big Rule Changes From October 1: १ ऑक्टोबरपासून ATM, FD, LPG आणि NPS संदर्भातले नियम बदलणार आहेत.१५ ऑक्टोबरपासून UPI व्यवहारांवरही बदल होण्याची शक्यता असून, ग्राहकांच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग, डिजिटल पेमेंट, एलपीजी आणि पेन्शनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. यातले बरेच बदल १ ऑक्टोबर २०२६ पासून, तर UPI चे बदल १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या नियमांची माहिती घेणं महत्त्वाचं आहे.

SBI ATM व्यवहारांची मर्यादा बदलणार

SBI च्या सॅलरी पॅकेज ग्राहकांसाठी दुसऱ्या बँकेच्या ATM मधून मिळणाऱ्या मोफत व्यवहारांची संख्या कमी होणार आहे. सध्या उपलब्ध असलेली १० मोफत व्यवहारांची मर्यादा ५ वर येणार आहे. यामध्ये रोख रक्कम काढण्यासोबतच बॅलन्स तपासण्यासारख्या व्यवहारांचाही समावेश असेल. मात्र SBI च्या स्वत:च्या ATM वर सॅलरी पॅकेज ग्राहकांना अमर्यादित मोफत व्यवहारांची सुविधा सुरू राहणार आहे.

बल्क FD च्या व्याजदरांची ऑनलाइन माहिती

१ ऑक्टोबरपासून बँकांना बल्क फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांची माहिती प्रत्येक कामकाजाच्या दिवशी ऑनलाइन प्रकाशित करावी लागणार आहे. समान दिवशी बुक केलेल्या समान बल्क डिपॉझिटसाठी साधारणपणे एकसमान व्याजदर लागू होईल. या बदलाचा सामान्य रिटेल FD च्या व्याजदरांवर थेट परिणाम होणार नाही.

२,००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर MDR

१५ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI मर्चंट पेमेंटवर MDR लागू होण्याची शक्यता आहे. २,००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क लागू होणार नाही. छोट्या व्यापाऱ्यांसाठी असलेल्या शून्य-MDR व्यवस्थेतल्या व्यवहारही मोफत राहतील.

LPG सब्सिडीसाठी आधार बायोमेट्रिक आवश्यक

१ ऑक्टोबरपासून LPG सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण करणं आवश्यक असेल. गॅस एजन्सी, संबंधित मोबाइल अॅप किंवा डिलिव्हरीच्या वेळी ही प्रोसेस पूर्ण करता येऊ शकते. व्हेरिफिकेशन केलं नाही तर सबसिडीच्या १४.२ किलो सिलिंडरचा लाभ मिळणार नाही.

NPS खाते उघडण्यासाठी नवीन शुल्क

NPS आणि NPS Lite मध्ये PoP च्या मदतीने खातं उघडणाऱ्या ग्राहकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवीन जॉइनिंग चार्ज लागू होईल. प्रत्येक PRAN साठी २०० रुपये शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे ऑक्टोबरपासून होणारे हे बदल बँक ग्राहक, LPG ग्राहक, UPI युजर्स आणि NPS खातेदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

Pitru Paksha : ना कांदा, ना लसूण; पितृपक्षात बनवा 'ही' झणझणीत रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT