Sakshi Sunil Jadhav
तु्म्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं.
Sub-Mission on Agricultural Mechanization (SMAM) या योजनेअंतर्गत शेतीतल्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
शेतकऱ्यांना यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर, सीड ड्रिल, रीपर, थ्रेशर, स्प्रेयर, हार्वेस्टर यांसह विविध कृषी उपकरणांवर अनुदान मिळू शकतं.
लघु आणि सीमांत शेतकरी, SC/ST आणि महिला शेतकरी तसेच ईशान्येकडील राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांना काही प्रकरणांत ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकतं.
इतर पात्र शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्रीच्या खरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद असू शकते.
जुलै २०२६ मध्ये देशभरातल्या वैयक्तिक शेतकऱ्यांना २१.६१ लाख कृषी यंत्रं वितरित करण्यात आली असून ९,४०४.४७ कोटींची मदत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना Direct Benefit Transfer in Agriculture Mechanization Portal अर्थात agrimachinery.nic.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करता येतो.
आधार कार्डाच्या मदतीने Farmer Registration आणि e-KYC केल्यानंतर बँक, जमीन आणि इतर माहिती भरावी लागते. त्यानंतर मंजूर डीलर निवडून खरेदी आणि सरकारी पडताळणीची प्रोसेस पूर्ण होते.