LPG Gas Cylinder Rates Today  Saam TV
बिझनेस

LPG Cylinder Price : निवडणूक निकालापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडर स्वस्त

LPG Price in Maharashtra Today : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.

Satish Daud

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत.

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी १ जून रोजी सिलिंडरच्या नव्या किंमती अपडेट्स केल्या आहेत. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या शेवटच्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी म्हणजेच १ मे रोजी मतदान होत आहे.

त्यानंतर संध्याकाळी देशात एक्झिट पोलची आकडेवारी सादर केली जाईल. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, या निकालाआधी गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त

IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानंतर दोन्ही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती अनुक्रमे १६७६ आणि १६२९ रुपये झाल्या आहेत.

कोलकातामध्ये सिलिंडरच्या दरात ७२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचा दर १७८७ रुपयांवर पोहचला आहे. दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचे शहर समजल्या जाणाऱ्या चेन्नई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ७० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरची किंमत १८४०.५० रुपयांवर आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. ९ मार्च घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यावेळी एलपीजीच्या किमतीत तब्बल १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये इतकी झाली. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा ८२९ रुपये, चेन्नईत ८१८.५० रुपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt : गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर संजय दत्तने खरेदी केली लग्जरी कार; किंमत वाचून व्हाल थक्क

Shocking: तरुण बनला हैवान! कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या, नंतर मृतदेहाजवळ गाणी गात बसला

Manoj Jarange: मुंबईच्या दिशेने मराठा रॅली; कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी पाहण्यासारखी| VIDEO

Maharashtra Live News Update: मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार- मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा मार्ग मोकळा! पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी, काय आहेत अटी-शर्ती?

SCROLL FOR NEXT