GST Collection November Saam TV
बिझनेस

GST Collection : GST कलेक्शनमध्ये बंपर वाढ, सरकारच्या तिजोरीत पडली 'इतक्या' कोटींची भर

GST Collection November : एकीकडे चीनची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना, भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. यातच आज (शुक्रवारी) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली आहे.

Satish Kengar

GST Collection November :

एकीकडे चीनची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना, भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. यातच आज (शुक्रवारी) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली आहे.

वित्त मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढले आहे. नोव्हेंबर 2023 हा महिना सरकारसाठी उत्तम महिना ठरला आहे. जीएसटी संकलनात दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा सलग नववा महिना आहे, जेव्हा मासिक जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात ही सहावी वेळ आहे, जेव्हा GST संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.  (Latest Marathi News)

या कारणांमुळे आली संकलनात तेजी

जीएसटी संकलनात या वाढीमागील कारण म्हणजे सणासुदीचा काळ असल्याचं सांगितलं जात आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, धनत्रयोदशी, आणि छठ या सणांमुळे जीएसटी संकलनात मोठी झेप घेतली आहे. असं असलं तरी ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये होते.

जीएसटी संकलन डेटा

वित्त मंत्रालयाने जीएसटी संकलनाचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,67,929 कोटी रुपये होते, जे ऑक्टोबरच्या आधीच्या महिन्यात 1,72,003 कोटी रुपये होते. FY24 मध्ये आत्तापर्यंतच्या जीएसटी संकलनाबद्दल बोलायचे झाले तर, सप्टेंबर महिन्यात 162712 कोटी रुपये, ऑगस्ट महिन्यात 159068 कोटी रुपये, जुलै महिन्यात 165105 कोटी रुपये, जून महिन्यात 161497 कोटी रुपये, 157090 रुपये आहे. मे महिन्यात 187035 कोटी रुपये आणि एप्रिल महिन्यात 187035 कोटी रुपये राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT