EPF 2026 rules google
बिझनेस

Big EPFO Update: मोठी बातमी! पीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आजारपण, लग्न आणि शिक्षणासाठी किती वेळा मिळणार अॅडव्हान्स?

EPF 2026 rules : ईपीएफओने २०२६ साठी पीएफ अॅडव्हान्स नियमांमध्ये बदल केला आहे. आजारपण, लग्न, शिक्षण, घर खरेदी आणि आतत्कालीन गरजांसाठी किती वेळा पैसे काढता येतील तसेच नवीन सेटलमेंट नियम जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या EPF 2026 नियमांनुसार पीएममधून अॅडव्हान्स रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता आजारपण लग्न, शिक्षण, घर खरेदी किंवा इतर गरजांसाठी किती वेळा पैसे काढता येतील. याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सर्वात मोठा बदल म्हणजे नोकरी सोडल्यानंतर पीएफच्या शेवटच्या सेटलमेंटसाठी आता जास्त दिवस वाट पाहावी लागणार आहे. याआधी बेरोजगार झाल्यानंतर २ महिन्यांनी संपूर्ण पीएफ काढता येत होता. नवीन नियमांनुसार आता शेवटच्या सेटलमेंटसाठी १२ महिने वाट पाहावी लागणार आहे.

पीएफ खात्यातल्या एकूण जमा रकमेतले २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. पात्र सदस्यांना त्यांच्या गरजेनुसार पात्र शिल्लक रकमेपैकी १०० टक्क्यांपर्यंत अॅडव्हान्स मिळू शकतो, पण बेसिक रक्कम शिल्लक ठेवणं गरजेचं आहे.

आजारपणाच्या उपचारांसाठी स्वत:च्या किंवा कुटुंबातल्या सदस्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी गरजेनुसार तुम्ही अॅडव्हान्स काढू शकता. तर उच्च शिक्षणासाठी स्वत:च्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण सदस्यत्व कालावधीत जास्तीत जास्त १० वेळा अॅडव्हान्स काढू शकता.

लग्नाच्या खर्चासाठी स्वतःचे, मुलांचे किंवा पात्र कुटुंबीयांच्या विवाहासाठी ५ वेळा अॅडव्हान्स काढता येतो. घर, फ्लॅट, प्लॉट खरेदी, घर बांधकाम, दुरुस्ती किंवा गृहकर्ज फेडण्यासाठीही वेगवेगळ्या श्रेणींमधून ५ वेळा अॅडव्हान्स घेण्याची परवानगी आहे.

विशेष किंवा आपत्कालीन परिस्थितीत, केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) मंजूर केलेल्या नियमांनुसार एका आर्थिक वर्षात दोन वेळा अॅडव्हान्स घेता येणार आहे. तसेच EPF सदस्य होऊन १२ महिने पूर्ण झाल्यानंतर, संबंधित नियमांनुसार एकूण पीएफ शिल्लक रकमेपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येईल. पण किती रक्कम मिळेल हे सदस्याची पात्रता आणि लागू असलेल्या नियमांवर अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT