LPG Gas Cylinders Rates Saam TV
बिझनेस

Gas Cylinder Price: मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, वाचा नवे दर...

LPG Gas Cylinder Rates: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

Satish Daud

Gas Cylinders Rates 1 March 2024

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. देशभरातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला आहे. त्यानुसार, १ मार्चच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी महागले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinders Rates) दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅसचे दर १ हजार ७४९ रुपये इतके झाले आहेत. तर दिल्लीत १,७९५ रुपये, कोलकात्यात १,९११ रुपये, आणि चेन्नईत १,९६० रुपये असेल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमतीत १४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. (Latest Marathi News)

त्याच्या एक महिना आधी म्हणजे जानेवारी महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) दरात १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा मार्चच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. कारण, बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती किती?

एकीकडे व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली असली, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे. यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती सिलिंडरचे दर बदलले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चपलेने मारलं, फावड्याने हल्ला केला; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला चोपलं,Video व्हायरल

पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, क्रूझरची ट्रकला जोरात धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT