BharatGas Buy Now Pay Later  Saam tv marathi
बिझनेस

LPG सिलिंडर आता लोनवर, कोणतेही व्याज नाही; फक्त महिना ₹१०० मोजावे लागणार, योजनेचा कसा घ्यावा लाभ?

BharatGas Buy Now Pay Later : भारतगॅस ग्राहकांसाठी मोठी सुविधा! LPG रिफिलसाठी ₹६०० पर्यंत बिनव्याजी मायक्रो लोन मिळू शकते. Buy Now, Pay Later योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि परतफेड कशी करायची जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

वाढत्या महागाईच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी भारत पेट्रोलियम (BPCL) म्हणजेच 'भारतगॅस'ने ग्राहकांसाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत आता ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या रिफिलसाठी थेट बिनव्याजी सूक्ष्म कर्ज (Micro Loan) मिळणार आहे. Buy Now, Pay Later असे नाव या योजनेला 'भारतगॅस'ने दिले आहे. या योजनेबाबत भारतगॅसने आपल्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) हँडलवरून माहिती दिली आहे.

गॅस रिफिल करताना ग्राहकाला ६०० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पैशांची परतफेड करताना एक रूपयाही व्याज लागणार नाही. तसेच या पैशांचे दरमहा अवघ्या १०० रुपयांच्या हप्त्यांमध्ये रूपांतर करता येणार आहे. अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना आणि सणासुदीच्या काळात एकाच वेळी पूर्ण पैसे देणे शक्य नसणाऱ्या ग्राहकांना या योजनेमुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Buy Now, Pay Later या योजनेमुळे कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना तसेच ऐन वेळी उद्भवणाऱ्या आर्थिक टंचाईच्या प्रसंगी या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. गॅस रिफिल करताना पैशांची अडचण असल्यास ग्राहकांना ६०० रुपयांपर्यंतचे सूक्ष्म कर्ज तात्काळ मिळू शकेल. या कर्जावर ग्राहकाकडून कसलेही अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही (Interest-Free Loan).

६०० रूपयांचे हे कर्ज 'Buy Now, Pay Later' (आधी खरेदी करा, पैसे नंतर द्या) या तत्त्वावर आधारित आहे. ग्राहकांना ६०० रुपयांची ही रक्कम एकत्र न देता दर आठवड्याला १०० रुपये याप्रमाणे ६ आठवड्यांच्या (हप्त्यांच्या) सोप्या टप्प्यांत परत करता येणार आहे. जेव्हा सिलेंडरची गरज भासते, तेव्हा संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरण्याचा ताण कमी करता येतो. ही सुविधा वनऍग्रो फिनटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या भागीदारीत उपलब्ध आहे.

'भारतगॅस'च्या या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

अचानक जर तुम्हाला एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरची गरज भासली आणि त्यासाठी लागणारे ₹६०० एकाच वेळी देण्याइतकी रक्कम तुमच्याकडे नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. भारतगॅसच्या या मायक्रो फायनान्स (सूक्ष्म कर्ज) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारतगॅस वितरकाशी (Gas Agency/Dealer) संपर्क साधावा. गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला या कर्जाची उपलब्धता, पात्रतेचे निकष आणि अर्ज कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

5 Breakfast Recipe: 5 मिनिटांत बनवा 5 झटपट आणि चविष्ट नाश्त्याचे प्रकार

Sharad Pawar: पवारांचं टायमिंग कुणालाच कळत नाही; शरद पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया व्हायरल

करदात्यांसाठी सर्वात मोठी बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली; पाहा नवी अंतिम तारीख

Google Search: गुगलवर चुकूनही या 5 गोष्टी सर्च करू नका, महागात पडेल

SCROLL FOR NEXT