Housing Society tenant rules : नियमांचं उल्लंघन केलं म्हणून तुमची सोसायटी (Housing Society) किंवा RWA (रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन) फ्लॅट रिकामा करून निघून जाण्यास सांगू शकते का? सोसायटी तसं करू शकत नाही. पण जर कधी अशी वेळ आली, तर त्याला आव्हान देण्यासाठी तुम्हाला भाडेकरू म्हणून तुमच्या अधिकारांबाबत माहिती असणं गरजेचं आहे.
त्यामुळं एखाद्या सोसायटीत किंवा RWA मध्ये फ्लॅट भाड्यानं घेताना कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी भाडेकरू म्हणून तुम्ही कोणत्या चार गोष्टी (सोसायटीच्या पोटनियमांपासून ते पार्किंगच्या जागेपर्यंत) तपासल्या पाहिजेत, हे जाणून घेऊयात...
सोसायटी थेट भाडेकरूला घर खाली करायला (evict) सांगू शकत नाही. कारण सोसायटी आणि भाडेकरू यांच्यात थेट करार नसतो. पण गंभीर प्रसंगी सोसायटी घरमालकावर दबाव आणू शकते किंवा पोलिसांकडे जाऊ शकते. त्यामुळेच रेंट ॲग्रीमेंटसोबत सोसायटीच्या नियमांची (Bylaws) प्रत जोडा आणि ते नियम मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र (Undertaking) लिहून घ्या.
सोसायटी रजिस्टर झाल्यावर पार्किंग स्लॉट वाटप करण्याची जबाबदारी सोसायटीची असते. नंतर कोणताही वाद किंवा भांडण टाळण्यासाठी तुमच्या रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला दिलेल्या पार्किंग स्लॉटचा क्रमांक स्पष्टपणे लिहून घ्या.
भाडेवाढ आणि घर रिकामे करण्याच्या अटी (Rent Escalation & Eviction Clauses) काळजीपूर्वक वाचा. कारण बहुतेक रेंट ॲग्रीमेंट हे ११ महिन्यांसाठी असतात. करारात भाडेवाढीची अट (Escalation Clause) असेल, तर तुम्हाला जास्त भाडे द्यावे लागू शकते. Supreme Court च्या निर्णयानुसार, ही अट करारात समाविष्ट असेल तर ती लागू होते.
भाडेकरार केल्यानंतर भाड्याच्या कालावधीची अंतिम तारीख लक्षात ठेवा. (End Date of Rent Period) कारण ११ महिने पूर्ण झाल्यावर जर नवीन करार केला नाही, तर तो करार महिन्या-दर-महिन्याच्या (month-to-month) आधारावर चालतो. अशा वेळी कोणतीही मुदत निश्चित नसल्यामुळे घरमालक फक्त १५ दिवसांची नोटीस देऊन करार संपवू शकतो.
महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलेट कोर्टाच्या एका प्रकरणानुसार, जर भाडेकरूला सोसायटीच्या नियमांची माहिती नसेल, तर त्यासाठी घरमालकही तितकाच जबाबदार धरला जातो. त्यामुळे भाड्याने राहण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि नियम नीट वाचून मगच स्वाक्षरी करा. त्यानंतरच रेंटच्या घरात राहायला जा. भाडेकर करताना रंगकाम कोण करणार? तुम्ही ३ वर्षांचा करार करत असाल तर प्रत्येकवर्षी किती भाडे वाढवले जाणार? याचा उल्लेख करा. भाडेकरार करताना छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख करा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा वर्षभर त्रास होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.