Cancer Insurance Policy
Cancer Insurance Policy Yandex
बिझनेस

Cancer Insurance Policy: एलआयसी कॅन्सर कव्हर प्लॅन! आजच खरेदी करा आणि उपचारासाठी मदत मिळवा

Rohini Gudaghe

Health Insurance LIC Cancer Cover Policy

कॅन्सर (Cancer) हे मृत्यूचं दुसरं नाव आहे. पण आता वैद्यकीय उपचारांमुळे यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं. कॅन्सरवर योग्य वेळी उपचार सुरू केले, तर तो बराही होऊ शकतो. कर्करोग बऱ्याचदा अटोक्यात येतो, पण उपचारासाठी येणारा खर्च हा आवाक्यातला नसतो. प्रत्येकाला त्याच्या उपचाराचा खर्च करणे परवडत नाही. (latest news)

आपण अनेकदा ऐकतो की, एखाद्याने आपल्या आयुष्याची कमाई कॅन्सरच्या उपचारासाठी खर्च केली. कोणी आपलं घर, मालमत्ता आणि शेत विकलंय. आता कॅन्सरबद्दल जागरुकता वाढत आहे, पण तितकीच रुग्णांची संख्याही वाढत आहे. निरोगी जीवन जगणारी माणसंही अचानक कॅन्सरला बळी पडल्याचं अनेकदा दिसून (Cancer Treatment) येतं. लहान मुलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत कर्करोग टाळता येत नाही, परंतु काही खबरदारी घेतल्यास त्याची शक्यता नक्कीच कमी करता येते. याशिवाय, आर्थिक स्तरावरही त्याच्याशी लढण्यासाठी स्वत:ला तयार करता येतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोग्य विमा पॉलिसी

आरोग्य विमा पॉलिसी आपल्याला यासाठी मदत करते. अनेक कंपन्यांच्या कॅन्सरवर आधारित विमा पॉलिसीही आहेत. भारतीय आयुर्विम महामंडळ-एलआयसीने एक वेगळी कॅन्सर कव्हर योजना तयार केली (Health Insurance) आहे. उपचारासाठी आपल्या हातात पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे. केवळ उपचारांसाठीच नाही तर उपचाराशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या खर्चासाठी पैशांची गरज असते.

LIC ची कॅन्सर कव्हर पॉलिसी हा खर्च कव्हर करते. LIC च्या कर्करोग कव्हर पॉलिसीमध्ये 100 टक्के उपचार कव्हर उपलब्ध आहे. याशिवाय दर महिन्याला एक टक्का कव्हर उपलब्ध आहे. जर तुमचा कॅन्सर कव्हर 30 लाख रुपये असेल, तर तुम्हाला पुढील 10 वर्षांसाठी दरमहा 30 हजार रुपये मिळतात. कॅन्सरवरील उपचारांमुळे विमाधारकाची नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही प्रभावित (Cancer Insurance Policy) होतात. अशा परिस्थितीत दर महिन्याला मिळणारी एक टक्का रक्कम हे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला हे मासिक उत्पन्न मिळत राहते.

एलआयसी कॅन्सर कव्हर प्लॅन

जर कर्करोग लहान असेल, तर तुम्हाला कव्हरपैकी 25 टक्के रक्कम मिळते. जर तुमचे कव्हर 30 लाख रुपये असेल, तर रुग्णाला उपचारासाठी 7.5 लाख रुपये मिळतात. कॅन्सर धोकादायक अवस्थेत पोहोचल्यावर उर्वरित रक्कम (LIC Cancer Cover Policy) मिळते.

तुम्ही वर्षाला 3,000 रुपयांची कॅन्सर पॉलिसी घेऊ शकता. 3,000 रुपये प्रति वर्षासाठी भरल्यास तुम्हाला 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. कॅन्सर कव्हर पॉलिसी फक्त 250 रुपयांत दरमहा घेता (Cancer Insurance) येते. ही पॉलिसी ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी आहे. LIC च्या कॅन्सर कव्हर पॉलिसीमध्ये निदानापासून उपचार आणि मासिक उत्पन्नापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. यासाठी तुम्हाला कर्करोग निदान अहवाल एलआयसी कार्यालयात जमा करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT