Bank Strike Deferred 3-day Nationwide Bank Strike Postponed After Iba-ufbu Talks saam tv
बिझनेस

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Bank Strike Postponed: देशव्यापी बँक संप पुढे ढकलण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर पुढील चर्चा करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले. सर्व शनिवार सुट्टी मिळावी ही महत्त्वाची मागणी आहे.

Bharat Jadhav

  • तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलण्यात आला आहे

  • IBA आणि UFBU यांच्यात २७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

  • पाच दिवसांचा बँकिंग आठवडा आणि सर्व शनिवार सुट्टी करण्याची मागणी चर्चेतील प्रमुख मुद्दा आहे.

देशभरातील लाखो बँक ग्राहक आणि व्यावसायिकांसाठी एक मोठा दिलासादायक बातमी आहे. सोमवार, २८ सप्टेंबरपासून सुरू होणारा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आलाय. 'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA) आणि प्रमुख बँक संघटनांचे प्रतिनिधीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आयबीए आणि बँक संघटनांमध्ये एकमत झालं असून संप पुढे ढकल्याचा निर्णय घेण्यात आलाय.

कामगार संघटनांनी सुरुवातीला २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली होती. जर हा संप झाला असता, तर महिन्याच्या अखेरच्या दिवसांत धनादेश वटवणे (चेक क्लिअरिंग), रोख रक्कम काढणे, ड्राफ्ट जारी करणे आणि पासबुक प्रिंटिंग यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर गंभीर परिणाम झाला असता.

सकारात्मक चर्चेनंतर निर्णय

रविवारी 'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA) आणि 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) यांच्यात त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका दिसून आली. त्यानंतर, सर्वसामान्यांची सोय लक्षात घेऊन संघटनांनी संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत

बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत:

सर्व शनिवारी सुट्टीचा मुद्दा: बँक कर्मचाऱ्यांची '५-दिवसीय बँकिंग आठवडा' आणि सर्व शनिवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी विचारात घेण्यासाठी, आयबीए आणि यूएफबीयू यांचा समावेश असलेली एक उच्च-स्तरीय समिती त्वरित स्थापन केली जाईल. ही समिती सर्व पर्यायांची पडताळणी करेल, संबंधित घटकांशी (स्टेकहोल्डर्स) चर्चा करेल. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन परस्पर मान्य अशा तोडग्यावर पोहोचेल.

स्केल IV आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी PLI योजना:

स्केल IV आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीच्या PLI योजनेबाबत युनियन्सनी उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निवारण करण्यासाठी, सरकारकडे सुधारणांचा प्रस्ताव पाठवण्याबाबत IBA सोबत चर्चा सुरू केली जाईल.

इतर प्रलंबित मुद्दे:

८ मार्च २०२४ रोजीच्या इतिवृत्तामध्ये नमूद केलेल्या उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांमधील चर्चा सुरू राहील. या मुद्द्यांवर सकारात्मक सहमती झाल्यामुळे UFBU ने आपले आंदोलन आणि संप पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केलीय. या परिपत्रकावर सी. एच. वेंकटाचलम, रूपम रॉय, एल. चंद्रशेखर, संजय खान, देबाशीष बसू चौधरी, प्रेम मक्कर आणि ओ. पी. शर्मा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक लवकरच जारी केले जाणार आहे.

जर हा संप झाला असता, तर बँका सलग तीन दिवस बंद राहिल्या असत्या आणि त्यामुळे नागरिक व व्यावसायिक अशा दोघांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असता. मात्र, रविवारी दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेनंतर, प्रस्तावित संप पुढे ढकलण्यास कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवली आहे. सोमवारपासून बँकांच्या सर्व शाखा उघड्या राहतील आणि नेहमीप्रमाणे कामकाज सुरू राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT