Bank Holidays September 2026: सप्टेंबर महिन्यात बँकेचे महत्त्वाचं काम असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये विविध राज्यांमध्ये सण, जयंती आणि स्थानिक कारणांमुळे बँकांच्या शाखा अनेक दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय दर रविवार तसेच महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार बँकांना सुट्टी असते.
महत्त्वाचं म्हणजे, बँकांच्या सु्ट्ट्या संपूर्ण देशात एकसारख्या नसतात. संबंधित राज्य किंवा बँकिंग सर्कलनुसार सुट्टीच्या तारखा बदलू शकतात. त्यामुळे शाखेत जाण्याआधी आपल्या शहराची किंवा राज्याची सुट्टी तपासणे फायदेशीर ठरेल.
४ सप्टेंबर - जन्माष्टमी, कृष्ण जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
११ सप्टेंबर - जयपूर नगर निगम क्षेत्रातल्या निवडणुकीमुळे राजस्थानातील संबंधित भागात सुट्टी असेल.
१२ सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेव यांच्या तिरुभाव तिथीनिमित्त आसामध्ये बँका बंद राहतील.
१४ सप्टेंबर - गणेश चतुर्थीत महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
१५ सप्टेंबर - संवत्सरी, नुआखाई आणि गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसानिमित्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
२१ सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव आणि श्री नारायण गुरू समाधी दिनानिमित्त आसाम आणि केरळमध्ये सुट्टी असेल.
२२ सप्टेंबर - कर्मा पूजेमुळे झारखंडमध्ये बँका बंद राहतील.
२३ सप्टेंबर - महाराजा हरिसिंग जयंतीनिमित्त जम्मू - काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
२५ सप्टेंबर - इंद्रजात्रा उत्सवानिमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
याशिवाय रविवार आणि दुसरा ,चौथा शनिवार यांचा समावेश केल्याने सप्टेंबरमध्य एकूण १५ दिवस बँका बंद असतील असं नाही. तसेच बँकेची शाखा बंद असली तरी ऑनलाइन बँकिंग सेवा सामान्यपणे वापरता येतात. ATM मधून पैसे काढणे, UPI पेमेंट, NEFT, IMPS आणि बिल यांसारख्या सुविधा उपलब्ध राहतात. Google Pay, PhonePe, Paytm आणि BHIM UPIच्या माध्यमातूनही व्यवहार करता येतील. त्यामुळे रोख रक्कम काढणे, चेक जमा करणे किंवा शाखेची संबंधित काम असेल तर सुट्टीच्या तारखा आधी तपासून नियोजन करणं योग्य ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.