नोव्हेंबर महिन्याच्या पुढच्या आठवड्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचं काम असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ९ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशातल्या विविध राज्यांमध्ये बँकांना तब्बल सहा दिवस सुट्ट्या असणार आहेत. दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि स्थानिक सणांमुळे काही शहरांमध्ये बँकांचं कामकाज बंद राहील. तसेच दसरा शनिवार आणि रविवार असल्याने देशभरातल्या बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातली सुट्ट्यांची यादी तपासून घेणं गरजेचं आहे.
या दिवशी अगरतळा, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनऊ आणि रायपूर येथील बँका बंद राहतील.
अहमदाबाद, बेलापूर (नवी मुंबई), बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, मुंबई आणि नागपूर येथील बँकांना सुट्टी असेल.
या दिवशी गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनऊ आणि शिमला येथील बँक शाखा बंद राहतील.
मेघालयातील स्थानिक सणानिमित्त केवळ शिलाँगमधील बँका बंद राहतील.
आरबीआयच्या नियमानुसार महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांना सुट्टी असते.
रविवार असल्याने देशभरातील सर्व बँकांच्या शाखा बंद राहतील.
बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांना आर्थिक व्यवहारांसाठी अडचण येणार नाही. कारण नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI आणि ATM यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहणार आहेत. ग्राहकांना UPI द्वारे पैसे पाठवता येतील, तसेच ATM मधून रोख रक्कम काढता येईल.
NEFT आणि RTGS यांसारख्या इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुविधांचाही वापर करता येईल. पण बऱ्याचदा काही वेळा तांत्रिक देखभालीमुळे डिजिटल सेवांमध्ये तात्पुरता उशीर होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.