Bank Holidays In April
Bank Holidays In April 
बिझनेस

Bank Holidays In April 2024: एप्रिल महिन्यात तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bank Holidays in April 2024:

काही दिवसात मार्च महिना संपणार आहे तसेच २०२३-२०२४ हे आर्थिक वर्षही संपणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिलच्या सुरुवातीला होणार आहे. १ एप्रिल रोजी अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. एप्रिल महिना ३० दिवसाचा असून या महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. (Latest News)

या काळात नवरात्री, ईद आणि इतर विशेष प्रसंगी बँका बंद राहतील. आरबीआय कोणत्या दिवशी आणि कोणत्या प्रसंगी बँका कोठे बंद राहणार आहेत? एप्रिलमधील बँक हॉलिडे लिस्ट पाहुया.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एप्रिलमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहतील

सोमवार, १ एप्रिल २०२४

सुट्टी का - आर्थिक वर्षाच्या शेवटी बँकेच्या खाते बंद होणार असल्याने सुट्टी असेल.

बँका कुठे राहतील बंद - कोची, कोहिमा, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम.

शुक्रवार, ५ एप्रिल २०२४ रोजी

सुट्टी - बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, आणि जमात-उल-विदासाठी बँक बंद असतील

बँका कुठे राहतील बंद - हैदराबाद-तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगर

रविवारी, ७ एप्रिल २०२४

सुट्टी का - साप्ताहिक सुट्टी

कुठे बँका राहतील बंद - देशभरातील बँका राहतील बंद.

मंगळवार, ९ एप्रिल

सुट्टी का - गुडीपाडवा, उगादी महोत्सव, तेलुगू नवीन वर्ष, पहिली नवरात्र

कुठे बँका बंद असतील - बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगर

बुधवार, १० एप्रिल

सुट्टी का - ईद

बँका कुठे असतील बंद -

कोची आणि केरळमध्ये बँक राहतील बंद.

बुधवार, ११ एप्रिल

सुट्टी का - ईद

बँका कुठे असतील बंद - संपूर्ण देशात बँक राहतील बंद

शनिवार, १३ एप्रिल

सुट्टी का - महिन्याचा दुसरा शनिवार

बँका कुठे असतील बंद - देशभरात बँका राहतील बंद

रविवार, १४ एप्रिल

सुट्टी का - साप्ताहिक सुट्टी

देशरातील बँक बंद राहतील बंद

सोमवार, १५ एप्रिल

सु्ट्टी का - हिमाचल प्रदेश दिन

बँका कुठे असतील बंद - गुवाहाटी, आणि शिमला, येथे बँक राहणार बंद

बुधवार, १७ एप्रिल रोजी

सुट्टी का - श्री रामनवमी

बँका कुठे असतील बंद -

गंगटोक हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पटना , अहमदाबाद, बेलापूर, भोपाल, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपुर, कानपूर, लखनऊ, पटना, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर.

शनिवार, २० एप्रिल

सुट्टी का - गारिया पूजा ,

बँका कुठे असतील बंद - अगरतळा

रविवार, २१ एप्रिल

सुट्टी का - साप्ताहिक सुट्टी

देशभरात बँका राहतील बंद.

याशिवाय २७ एप्रिल आणि २८ एप्रिल २०२४ रोजी बँकेला सुट्टी असेल. चौथा २७ एप्रिलला शनिवार आणि २८ एप्रिलला रविवार आहे. यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र बँकेला सु्ट्टी असूनही ग्राहकांना पैशाचे व्यवहार करता येणार आहेत. ऑनलाइन सुविधांचा अवलंब करून तुम्ही व्यवहार करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis : अमरावती जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; मेळघाट परिसरात तीन दिवसांनी येतेय टँकर

Wardha Crime News : नवऱ्याला मध्यरात्रीच संपवलं; बायकोनं बनाव रचला, रिपोर्ट आला अन् बिंग फुटलं!

Today's Marathi News Live : वर्ध्यात अचानक वातावरणात बदल; पावसाची हजेरी, पिकांना फटका

KL Rahul Statement: 'शब्दच नाहीये..', केएल राहुलने दारुण पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं?

Summer Health Tips: उन्हाळ्यात फिट अँड फाईन राहण्यासाठी आहार कसा असावा?

SCROLL FOR NEXT