बँकेच्या कामासाठी तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातल्या बँका बंद राहणार नाहीत. या दिवशी मेघालयातल्या काही भागात ‘युनिटेरियन अॅनिव्हर्सरी डे’ निमित्त बँकांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय सरकारच्या आदेशानुसार ईस्ट खासी हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स आणि साऊथ वेस्ट खासी हिल्ससारख्या भागांमध्ये बँका आणि आर्थिक संस्था बंद राहणार आहेत.
‘युनिटेरियन अॅनिव्हर्सरी डे’ दरवर्षी १८ सप्टेंबरला साजरा केला जातो. हा दिवस मेघालयातल्या युनिटेरियन धार्मिक चळवळीच्या सुरुवातीच्या स्मरणार्थ पाळला जातो. त्यामुळे या भागातल्या ग्राहकांनी बँकेशी संबंधिक कामकाजाचे नियोजन करताना सुट्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ सप्टेंबरची ही सुट्टी देशव्यापी नाही. महाराष्ट्रासोबत दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर बहुतांश राज्यांमध्ये बँकांच्या शाखा नियमितपणे सुरू राहतील. मात्र, स्थानिक पातळीवरील सुट्ट्या शहर किंवा जिल्ह्यानुसार बदलू शकतात.
१८ सप्टेंबरनंतर २० सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. २१ आणि २२ सप्टेंबरला काही राज्यांमध्ये प्रादेशिक सणांमुळे बँकेच्या सुट्ट्या आहेत. २३ सप्टेंबरला महाराजा हरि सिंह जयंतीनिमित्त जम्मू- काश्मीरमध्ये सुट्टी आहे. २५ सप्टेंबरला इंद्रजात्रेनिमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. २६ सप्टेंबर हा चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. प्रादेशिक सुट्ट्यांची अंमलबजावणी शहरानुसार वेगळी असू शकते.
ग्राहकांनी बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातल्या RBI बँक हॉलिडे कॅलेंडरमध्ये तपासावे. शाखा बंद असली तरी UPI,मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग आणि ATM सारख्या डिजिटल सेवा साधारणपणे उपलब्ध राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.